Budget 2024: अर्थसंकल्पात करदात्यांना मिळू शकतो दिलासा; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात करामध्ये काही प्रमाणात दि लासा मिळू शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Budget 2024 Tax payers can get relief in Budget; what the experts says
Budget 2024 Tax payers can get relief in Budget; what the experts saysSakal
Updated on

Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात करामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात जनतेचे लक्ष प्रामुख्याने आयकर घोषणा आणि सवलतीकडे असणार आहे.

आयकर संदर्भाच्या सवलतीबाबत अर्थतज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकार पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात कर कपातीची रक्कम वाढवून करदात्यांना दिलासा देऊ शकते आणि महिलांसाठी काही स्वतंत्र कर सूट देऊ शकते.

काही अर्थतज्ज्ञांचे असेही मत आहे की हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, त्यामुळे आयकराच्या बाबतीत कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.

अर्थमंत्री सीतारामन 1 फेब्रुवारीला लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल. सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजचे अध्यक्ष सुदीप्तो मंडल यांनी पीटीआयला सांगितले की, अंतरिम बजेटमध्ये नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना आयकरावर थोडा दिलासा मिळू शकतो.

करदात्यांना दिलासा देण्यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात लखनौच्या गिरी विकास अध्यान संस्थेचे संचालक प्रमोद कुमार म्हणाले की, याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. आर्थिक घटकांव्यतिरिक्त, ते इतर अनेक गोष्टींवर देखील अवलंबून असते.

Budget 2024 Tax payers can get relief in Budget; what the experts says
Gold Import Duty: सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?

मात्र, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने करदात्यांची मते आकर्षित करण्यासाठी काही सवलती दिल्या जाऊ शकतात.

एनआर भानुमूर्ती, अर्थतज्ज्ञ आणि सध्या डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी, बेंगळुरूचे कुलगुरू म्हणाले की, हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.

अशा स्थितीत करप्रणालीत फारसा बदल अपेक्षित नसावा, कारण वर्षभराचा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत केवळ खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणे हाच त्याचा उद्देश असतो. त्यामुळे मला कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.

Budget 2024 Tax payers can get relief in Budget; what the experts says
Stock Market Crash: शेअर बाजारात त्सुनामी! गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी या आर्थिक संशोधन संस्थेतील प्रोफेसर लेखा चक्रवर्ती म्हणाल्या की, महिला मतदारांवर भर देताना, आयकर कलम 88C अंतर्गत महिलांना काही स्वतंत्र कर सूट दिली जाऊ शकते.

त्या म्हणाल्या की, आयकर भरणारे लोक भारतीय लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहेत, त्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी कर सवलतीशी संबंधित घोषणांचा फारसा परिणाम होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.