केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ सादर केला असून त्यांनी महिलांसाठी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये आतापर्यंत महिलांसाठी केलेल्या कामाचा लेखा जोखा वाचला तसेच भविष्यात महिलांविषयी कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे त्याबाबत सांगितले.
सरकारी प्रयत्नामुळे महिलांची उद्योजकता २४ टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे.
एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे.
सर्व्हायकल कँसरबाबत (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ) ९ ते १४ वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे.
तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरविले.
महिलांसाठी विधानसभेमध्ये एक ततृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य कवच देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.