Budget 2024: मोदी सरकार 8वा वेतन आयोग लवकरच आणणार? अर्थसंकल्पात घोषणा करण्याची शक्यता

Budget Expectation 2024: तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला येणाऱ्या बजेटमध्ये चांगली बातमी मिळू शकते. केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.
Budget Expectation 2024 8th pay commission fm nirmla sitharaman salary hike
Budget Expectation 2024 8th pay commission fm nirmla sitharaman salary hike Sakal
Updated on

Budget Expectation 2024: तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला येणाऱ्या बजेटमध्ये चांगली बातमी मिळू शकते. केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.

मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकार सध्या 8 वा वेतन आयोग आणण्याचा विचार करत नसल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, यावेळी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी आगामी अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाबाबत विचार करु शकते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

Budget Expectation 2024 8th pay commission fm nirmla sitharaman salary hike
Vibrant Gujarat: रिलायन्स, मारुती आणि टाटा समूहाने गुजरातमध्ये केल्या गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा

त्यानंतर देशात लोकसभा निवडणुका होतील आणि नंतर जे सरकार निवडून येईल ते देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. अशा स्थितीत निवडणुकीच्या दृष्टीने अंतरिम अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते

अंतरिम बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठ्या घोषणा करू शकते. सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीचे वर्ष पाहता कर्मचाऱ्यांना सरकार मोठी भेट देऊ शकते.

Budget Expectation 2024 8th pay commission fm nirmla sitharaman salary hike
Ram Mandir: प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत मालमत्ता खरेदी करायची आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

निवडणुकीपूर्वी घोषणा होऊ शकते

पुढील वेतन आयोगाची घोषणा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी म्हणजेच अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय असणार आणि काय असणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांवर असेल.

त्यांच्या देखरेखीखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.