गुंतवणुकीची लिटमस चाचणी

‘आधी गुंतवणूक करा आणि मग उरलेल्या पैशांमध्ये आपले आयुष्य जगा’ असे गुंतवणूकदारांचे पितामह वॉरेन बफे यांचे म्हणणे आहे.
budget investment Warren Buffett finance money management
budget investment Warren Buffett finance money managementEsakal
Updated on

- विक्रम अवसरीकर

‘आधी गुंतवणूक करा आणि मग उरलेल्या पैशांमध्ये आपले आयुष्य जगा’ असे गुंतवणूकदारांचे पितामह वॉरेन बफे यांचे म्हणणे आहे. अमेरिकेमध्ये नागरिकांना सरकारी मदत मिळते त्यामुळे तिथे असे जगणे सोपे असेल; परंतु, भारतात ते अशक्य आहे.

इथे आपले बजेट बघूनच हातपाय पसरावे लागतात. त्यामुळे खूप जण विचार करतात, की मला पाच वर्षांनी एक कोटी रुपये लागतील, तर त्यासाठी मला आज किती रक्कम गुंतवावी लागेल? किती टक्के परताव्याने ती किती वर्षात एक कोटी होईल? ही आकडेमोड सोयीची असली, तरी प्रत्यक्षात ते तसे आपण करू शकू का? हे ज्याचे त्याला माहिती असते.

‘जोखीम’ या लेखमालेच्या पहिल्या दोन भागात आपण बघितले, की जोखीम म्हणजे नक्की काय आणि वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवून ती कशी कमी करता येईल आणि त्यामुळे तोटा व्हायची शक्यता कमी होऊन फायद्याची शक्यता कशी वाढते.

आता तिसऱ्या आणि शेवटच्या भागात, सोप्या पद्धतीने गुंतवणूक कशी करायची आणि अर्थचक्र सुगमपणे चालू राहण्यासाठी काय करावे? याची माहिती घेऊया. तुमच्या असे लक्षात येईल, की ही लिटमस चाचणी अतिशय सोपी आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त अचूक निर्णय घेऊ शकतो.

आपल्या उत्पन्नाचे तीन प्रमुख भाग पडतात.

अपरिहार्य खर्च : शिक्षण, घरखर्च, हप्ते, वीजबिल वगैरे

ऐच्छिक खर्च : आपण किती वेळा खरेदी करतो, पार्ट्या, सहली, भेटवस्तू देणे वगैरे

सुरक्षिततेसाठी रोख बचत ः रोख रक्कम बाजूला ठेवणे

हे व्यक्तिसापेक्ष आहे, कोणाला दोन हजारांत सुरक्षित वाटेल, तर कोणाला एका लाखातही असुरक्षित वाटेल. या तीनही प्रकारच्या रकमा वगळल्यानंतर काही रक्कम शिल्लक राहाते किंवा उरायला पाहिजे. ही रक्कम म्हणजे श्री शिल्लक असे म्हणू. ज्यावेळी ही रक्कम आपण शोधून काढतो, त्यावेळेस आपण तीन गोष्टींवर निर्णय घेऊ शकतो.

श्री शिलकीतील किती रक्कम दीर्घावधीसाठी आणि किती रक्कम अल्पमुदतीसाठी गुंतवावी. किती रकमेवर जोखीम घ्यावी, किती रक्कम सुरक्षित गुंतवावी. किती रक्कम अडकून ठेवावी, किती रक्कम कधीही उपलब्ध होईल, अशाप्रकारे गुंतवावी. समजा, एखाद्या व्यक्तीकडे दहा हजार रुपये श्री शिल्लक दरमहा उरत आहे, तर ती व्यक्ती तीन हजार रुपये अधिक जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवण्याचा विचार करू शकते.

दरमहा दोन हजार रुपये गुंतवून दहा वर्षांनी मोठी एकरकमी मुद्दल घेऊ शकते आणि उरलेले पाच हजार रुपये दरमहा फक्त एकाच वर्षासाठी गुंतवायचे आहेत. यामुळे किती जोखीम घ्यायची याची स्पष्ट कल्पना येते. ही रक्कम विभागून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवून आपण जोखीम कमी करतो आणि तोट्याची शक्यता कमी करतो. श्री शिल्लक शोधल्याचा फायदा होतो. या लिटमस चाचणीचा वापर करून आपले गुंतवणुकीचे वारे कुठे वाहात आहेत, याचा अचूक अंदाज येतो.

दरमहा पैसे साठवण्यातून फायदा

एखादा माणूस दरमहा दहा हजार रुपये बाजूला काढत असेल आणि त्याला असे वाटत असेल, की आपल्याकडे रोख एक लाख रुपये अडीनडीला असावेत, तर दहा महिन्यांतच त्याच्याकडे एक लाख रुपये जमतील.

आता एका लाखावर आणखी एक वरची पातळी ठरवून घ्यायची. समजा, पंधरा महिन्यांत दीड लाख जमले, की त्यातले वरचे पन्नास हजार काढून उर्वरित रक्कम एकरकमी गुंतवावी. म्हणजे प्रत्येक महिन्याला गुंतवणूकही होईल आणि ठराविक काळाने एकरकमी गुंतवणूक होऊन मोठा निधीही जमा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()