Budget 2024: गरिबी हटाव ते राम मंदिर, राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Budget 2024: आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती केंद्र सरकारच्या कामकाजाची आणि आर्थिक धोरणांची रूपरेषा संसदेत मांडली.
budget session 2024 updates president droupadi murmu address important points
budget session 2024 updates president droupadi murmu address important points Sakal
Updated on

Budget 2024: आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती केंद्र सरकारच्या कामकाजाची आणि आर्थिक धोरणांची रूपरेषा संसदेत मांडली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे-

1. संविधानाच्या अंमलबजावणीच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशाने स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करून देशाच्या तरुण पिढीने पुन्हा स्वातंत्र्याचा काळ जगला. राष्ट्राने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला.

2. देशाच्या कानाकोपऱ्यातून हुतात्म्यांच्या गावातून दिल्लीत आणलेल्या मातीचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाल्या की, अमृत कलश दिल्लीत आणणे हा ऐतिहासिक क्षण होता. त्यासाठी सरकारने 'मेरी माटी मेरा देश' अभियान सुरू केले, ते कौतुकास्पद आहे.

3. नवीन संसद भवनात आपल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मागील वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले होते. सलग दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 7.5 टक्के राहिल्याचा उल्लेख त्यांनी केला. डिजिटल इंडियासारख्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

4. जगातील गंभीर संकटांमध्ये, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला.

budget session 2024 updates president droupadi murmu address important points
Budget 2024: अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

5. राष्ट्रपती म्हणाल्या की, सरकार 'न्याय-सर्वोच्च' या तत्त्वावर काम करत आहे. डिजिटल डेटाचे संरक्षण करण्यासाठी देशात कायदे केले जात आहेत. नॅशनल रिसर्च फाउंडेशन कायद्यामुळे देशात संशोधन वाढत आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित कायद्याचाही त्यांनी उल्लेख केला.

6. राम मंदिर बांधण्याची आकांक्षा शतकानुशतके होती. आज राम मंदिर बांधले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका होत्या. आज तो इतिहास आहे. याच संसदेने तिहेरी तलाकविरोधात कडक कायदा केला.

7. सरकारने वन रँक वन पेन्शनही लागू केली, ज्याची चार दशकांपासून प्रतीक्षा होती. OOP लागू झाल्यानंतर माजी सैनिकांना अंदाजे 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्यांदाच भारतीय लष्करात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.

8. गेल्या 10 वर्षांत भारताने राष्ट्रहिताची अशी अनेक कामे पूर्ण करताना पाहिली आहेत ज्याची देशातील जनता अनेक दशकांपासून वाट पाहत होती. आज अर्थव्यवस्थेच्या विविध आयामांवर नजर टाकली, तर भारत योग्य दिशेने आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात व्यवसाय करणे सोपे व्हावे आणि त्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.

budget session 2024 updates president droupadi murmu address important points
Economic Survey: अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर होणार नाही; काय आहे कारण?

9. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात उद्योग क्षेत्रातील लोकांसाठी केलेल्या योजना आणि पारदर्शकता यावी यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती देण्यात आली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना लाखो कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळण्याची खात्री आहे. कृषी उत्पादनांची निर्यातही वाढत आहे.

10. गरिबी हटावचा नारा आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आता आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच आपण मोठ्या प्रमाणावर गरिबी दूर होताना पाहत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()