Byju’s Crisis: भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 100 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी त्यांचे घर गहाण ठेवले आहे.
अहवालानुसार, बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची घरे गहाण ठेवली आहेत.
गहाण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये कुटुंबाची बेंगळुरूमधील दोन निवासस्थाने आहेत. या बदल्यात रवींद्रन यांच्या कंपनीने 12 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. मात्र, या कर्ज व्यवहाराचा खुलासा अद्याप झालेला नाही.
Byju's ने अलीकडेच अमेरिकेचे Kids Digital Reading Platform विकले आहे, त्यानंतरही कंपनी संकटात आहे. बायजूसच्या रवींद्रनने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची मालमत्ता गहाण ठेवून त्यांच्या कर्मचार्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
बायजूच्या मूळ फर्म थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी बँकेकडे त्याची मालमत्ता गहाण ठेवून हे पाऊल उचलले आहे. रवींद्र आणि बायजू यांच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने बायजूवर छापा टाकला होता ज्यात थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडवर एफडीआय अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे, तर तपासात असेही आढळून आले आहे की त्यांनी परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,000 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.