Byjus Office: 2014 नंतर भारताने 'स्टार्टअप बूम' पाहिला आणि Byjus कंपनी सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी बनली होती. ही देशातील पहिली युनिकॉर्न कंपनी होती. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी ज्याचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे. कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळाले होते.
परंतु आता परिस्थिती अशी आहे की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांना त्यांची सर्व मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स गहाण ठेवावे लागले आहेत. स्टार्टअप कंपनीला आता आपली कार्यालये बंद करण्यास भाग पाडले जात आहे. याची सुरुवात बेंगळुरूपासून झाली आहे. (Byju's vacates 4 lakh sq ft Bengaluru office space to cut costs)
अहवालानुसार, Byju's ने खर्च कमी करण्यासाठी ऑफिस स्पेस कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने अलीकडेच प्रेस्टीज टेक पार्क, बेंगळुरू येथे 4 लाख चौरस फूट कार्यालयाची जागा रिकामी केली आहे. या कार्यालयाच्या जागेचा भाडे करार वर्षाच्या सुरुवातीलाच संपला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीचा जमीनमालकाशी अनेक मालमत्तांबाबत वाद सुरू आहे. (Troubled edtech firm Byju's vacates 4 lakh sq ft office space in Bengaluru)
बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्नने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी प्रेस्टीज ग्रुपकडून बेंगळुरूमधील मालमत्ता भाडेतत्त्वावर घेतली होती. या कार्यालयाच्या जागेसाठी कंपनी दरमहा चार कोटी रुपये भाडे देत होती.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बेंगळुरूमधील कंपनीच्या आणखी एका कार्यालयावर अडचणीचे ढग दाटून आले आहेत. बायजूने गेल्या 10 महिन्यांपासून मालमत्तेचे भाडे दिलेले नाही. त्यानंतर कल्याणी बिल्डर्सने डिपॉझिटमधून 7 महिन्यांचे भाडे कापून बायजूला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.