CAG Report: अब की बार 'मोदी सरकार' भ्रष्टाचाराच्या कचाट्यात, कॅगने केली 7 प्रकल्पांची पोलखोल!

CAG Report: मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे.
CAG Report
CAG ReportSakal
Updated on

CAG Report: देशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, महागाई, बेरोजगारी इत्यादी जनतेशी निगडित प्रमुख मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्यात विरोधी पक्षांना आतापर्यंत अपयश आले आहे.

अविश्वास प्रस्ताव आणून सरकारला घेराव घालण्याची विरोधकांची रणनीतीही प्रभावी ठरली नाही. मात्र आता कॅगच्या अहवालामुळे त्यांना मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची मोठी संधी मिळाली आहे. या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्याची बाब समोर आली आहे.

आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे. 

कॅगचा अहवाल आल्यानंतर आणि या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसला मोठा मुद्दा मिळाला आहे. या अहवालावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

CAG Report
RBI Guidelines: आरबीआयने कर्ज खात्यातील दंडाबाबत बँकांना दिल्या सूचना, केला मोठा बदल

सुप्रिया श्रीनेत उपरोधिकपणे म्हणाल्या की, “एक संस्था प्रामाणिक पंतप्रधानांना भ्रष्ट म्हणत आहे. यावर पंतप्रधानांनी कठोर कारवाई करावी. याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांना पाठवुन धडा शिकवला पाहिजे. पीएम मोदींची प्रतिमा मलिन करणाऱ्या या संस्थांना देशद्रोही ठरवावे, त्यांना तुरुंगात टाकावे.''

CAG Report
Nirmala Sitharaman Birthday: लंडनमधील सेल्सवुमन ते देशाच्या अर्थमंत्री असा आहे निर्मला सीतारामन यांचा प्रवास

कॅगच्या अहवालात कोणते घोटाळे उघड झाले?

  • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेल्या 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.

  • भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.

  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची वसुली

  • आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल नंबर वरून नोंद

  • अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान

  • द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.