CAG report: अपात्र लाभार्थ्यांवर सरकारचा कोट्यवधींचा खर्च, जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेत आढळल्या त्रुटी

PMJAY registration: अपात्र लाभार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
CAG report Narendra modi
CAG report Narendra modiSakal
Updated on

PMJAY registration CAG report: जगातील सर्वात मोठ्या भारताच्या सार्वजनिक आरोग्य हमी योजनेच्या डेटाबेसमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या (कॅग) अहवालात ही बाब समोर आली आहे.

या तफावतींमुळे अपात्र लाभार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम मुख्यत्वे अपुऱ्या पडताळणीमुळे अपात्र लाभार्थ्यांवर खर्च करण्यात आली आहे.

अहवालानुसार, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील अनेक निवृत्तीवेतनधारकांकडे पीएमजेएवाय (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) कार्ड असल्याचे आणि योजनेअंतर्गत उपचार घेताना आढळले.

आयुष्मान भारत- पंतप्रधान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणीतील अनियमितता अधोरेखित करून, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने उघड केले आहे की जवळपास 7.5 लाख लाभार्थी एकाच सेलफोन नंबर 9999 99999 द्वारे जोडले गेले होते.

CAG report Narendra modi
Ambareesh Murty Journey : शून्यातून उभे केले 'पेपरफ्राय'चे साम्राज्य! असा होता अंबरीश मूर्ती यांचा प्रवास

सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आयुष्मान भारत - PMJAY वरील लेखापरीक्षण अहवालात कॅगने म्हटले आहे की योजनेचे 7,49,820 लाभार्थी एका मोबाईल क्रमांकाशी जोडले गेले होते.

“BIS डेटाबेसच्या डेटा विश्लेषणातून असे दिसून आले की अवैध मोबाइल नंबरवर मोठ्या संख्येने लाभार्थी नोंदणीकृत होते. एकूणच, BIS डेटाबेसमध्ये 1,119 ते 7,49,820 लाभार्थी एकाच मोबाईल क्रमांकाशी जोडलेले होते” असे अहवालात नमूद केले आहे.

CAG report Narendra modi
प्रभावी गुंतवणूक पर्याय

कॅगच्या अहवालात म्हटले आहे की आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या डेटाबेसमधील त्रुटींमध्ये अवैध नावे, चुकीच्या जन्मतारखा, डुप्लिकेट हेल्थ आयडी आणि अवास्तव कुटुंबातील सदस्यांची संख्या यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.