Ceigall India IPO : सीगल इंडियाला सेबीकडून आयपीओसाठी ग्रीन सिग्नल, काय करते कंपनी ?

आयपीओअंतर्गत, कंपनी अंदाजे 618 कोटीचे नवीन इक्विटी शेअर जारी करेल. याशिवाय 1.42 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील.
Ceigall India gets approval from SEBI for IPO here are details of company
Ceigall India gets approval from SEBI for IPO here are details of companySakal
Updated on

भारतातील लीडिंग स्पेशलाइज्ड इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक सीगल इंडिया (Ceigall India) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. या आयपीओला नुकतीच बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे.

आयपीओअंतर्गत, कंपनी अंदाजे 618 कोटीचे नवीन इक्विटी शेअर जारी करेल. याशिवाय 1.42 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील. या अंतर्गत कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स त्यांचे शेअर्स विकतील.

फ्रेश इश्यूद्वारे उभारल्या जाणाऱ्या एकूण 618 कोटींपैकी सीगल इंडिया 119 कोटी इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी वापरेल. याव्यतिरिक्त, कंपनीने कर्जाची परतफेड/प्री-पेमेंटसाठी 344 कोटी वापरणार आहे. सीगल इंडिया ही पायाभूत सुविधा निर्माण करणारी कंपनी आहे ज्याला एलिवेटेड रोड्स, फ्लायओव्हर्स, पूल, रेल्वे ओव्हर ब्रिज, बोगदे, महामार्ग, एक्स्प्रेस वे आणि रनवे यासारखी स्पेशलाइज्ड स्ट्रक्चरल कामे करण्याचा अनुभव आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये, सीगल इंडिया एका छोट्या बांधकाम कंपनीतून एक EPC प्लेयर बनली आहे ज्यामध्ये स्पेशलाइज्ड स्ट्रक्चरसह महामार्ग प्रोजेक्ट्सचे डिझाइन आणि बांधकाम कौशल्य आहे. कंपनीचे बिझनेस ऑपरेशन्स भारतातील दहा राज्यांमध्ये पसरलेल्या इपीसी प्रोजेक्ट आणि HAM प्रोजेक्ट्समध्ये विभागलेले आहेत.

केअरच्या अहवालानुसार, इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर जीडीपीमध्ये 3.5 टक्के योगदानासह प्रमुख भूमिका बजावत राहील आणि 2024 ते 2028 या आर्थिक वर्षांमध्ये या क्षेत्रात सुमारे 53,000 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीसाठी रस्ते बांधणी हा सर्वात महत्त्वाच्या सेगमेंट्समधील एक आहे.

Ceigall India gets approval from SEBI for IPO here are details of company
BlackBuck IPO : 'हा' स्टार्टअप लवकरच आणणार 550 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घेऊ...

केंद्र सरकारने आपल्या गुंतवणुकीवर भर दिला असून सीगल इंडियाचे प्रोजेक्ट्स नियोजित वेळेत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्याची क्षमता असल्याने त्याचा फायदा होणार आहे. सीगल इंडिया ही सर्वात वेगाने वाढणारी इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने इपीसी प्रोजेक्ट्स आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल (HAM) प्रोजेक्ट्समध्ये विभागलेला आहे. सीगल इंडियाने रस्ते आणि महामार्ग क्षेत्रातील 16 इपीसी आणि एक HAM प्रोजेक्टसह 34 हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.

31 जानेवारी 2024 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये NHAI द्वारे प्रदान केलेल्या प्रोजेक्ट्सचे 81.72% योगदान आहे. NAHI व्यतिरिक्त, कंपनीच्या इतर ग्राहकांमध्ये IRCON, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस (MES) आणि बिहार स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (BSRDCL) यांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.