Government Scheme: केंद्र सरकारची नववर्षाची मोठी भेट! सुकन्यासह 'या' योजनांचे व्याजदर वाढले, सविस्तर वाचा

लहान बचत योजनांच्या व्याजदरात ही वाढ १०-२० BPS इतकी करण्यात आली आहे. ज्या लघु बचत योजनांचे व्याजदर वाढले आहेत त्यात सुकन्या समृद्धी आणि 3 वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी यांचा समावेश आहे.
 money
money Sakal
Updated on

Government Scheme: सरकराने नवीन वर्षानिमित्त आनंदाची बातमी दिली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये बचत करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२४ पर्यंत २ लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.

लहान बचत योजनांच्या व्याजदरात ही वाढ १०-२० BPS (Business process services) इतकी करण्यात आली आहे.ज्या लघु बचत योजनांचे व्याजदर वाढले आहेत त्यात सुकन्या समृद्धी आणि 3 वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी यांचा समावेश आहे.सुकन्या व्याजदर २० BPS ने वाढले आहेत.

यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८ टक्के होता, तो आता ८.२० टक्के झाला आहे. या योजनेअंतर्गत किमान ठेव रक्कम २५० रुपये आहे आणि आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ठेव रक्कम १.५ लाख आहे. सुकन्या समृद्धी योजना खाते पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये उघडता येते.

 money
Dombivali Crime : महिलांनी बनावट दागिने देऊन सराफाला 11 लाखाला फसविले

३ वर्षांच्या ठेवींच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. या कालावधीतील ठेवींवरील व्याज दर ७.१ टक्के झाला आहे, जो पूर्वी ७ टक्के होता. मात्र, PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. PPF च्या व्याजदरात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ बदल झालेला नाही. ते एप्रिल-जून २०२० मध्ये शेवटचे बदलले होते.

जानेवारी-मार्च २०२४ साठी व्याज दर

बचत ठेव: ४ टक्के

१-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ६.९ टक्के
२-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७ टक्के
३-वर्षे पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७.१ टक्के
५-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७.५ टक्के
५ वर्षांचे RD: ६.७ टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC): ७.७ टक्के
किसान विकास पत्र: ७.५ टक्के
PPF: ७.१ टक्के
सुकन्या समृद्धी योजना : ८.२ टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ८.२ टक्के
मासिक उत्पन्न खाते: ७.४ टक्के

 money
Girish Mahajan : ''त्यांना चप्पल घ्यायला पैसे राहणार नाहीत...'' गिरीश महाजन एकनाथ खडसेंना नेमकं काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.