Cyber Crime: सरकारची मोठी कारवाई! गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 100हून अधिक साइटवर घातली बंदी

Cyber Crime: सर्वसामान्य नागरिकांना फसवणाऱ्या साइट्सवर सरकारने कारवाई केली आहे.
Centre bans 100 websites involved in organised investment crimes, task-based job frauds
Centre bans 100 websites involved in organised investment crimes, task-based job frauds Sakal
Updated on

Cyber Crime: लोन अॅप्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना फसवणाऱ्या साइट्सवर सरकारने कारवाई केली आहे. सरकारने अशा 100 हून अधिक साइट्सवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी कायदा, 2000 अंतर्गत या साइट्सवर बंदी घातली आहे.

712 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण

हैदराबाद पोलिसांनी अशा प्रकारची सर्वात मोठी फसवणूक उघड केली होती ज्यामध्ये सुमारे 712 कोटी रुपयांची फसवणूक केली होती आणि ही फसवणूक चीनमधून ऑपरेट केली जात होती. यामध्ये टेलिग्राम अॅपद्वारे अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली लोकांना फसवण्यात आले. या प्रकरणात, हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार आली होती.

व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून असे घोटाळे वाढत आहेत. हैदराबाद पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या फसवणुकीत झालेल्या काही क्रिप्टो वॉलेट व्यवहारांचा हिजबुल्ला वॉलेटशी संबंध होता. हिजबुल्ला हा लेबनीज मिलिशिया गट आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

गृह मंत्रालय सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सायबर धोक्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले फोन नंबर आणि सोशल मीडिया हँडलची माहिती ताबडतोब NCRP www.cybercrime.gov.in वर कळवावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे.

Centre bans 100 websites involved in organised investment crimes, task-based job frauds
Forbes: निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 32व्या स्थानी, जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समावेश

तुम्ही 1930 वर तक्रार करू शकता

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून या वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांचा प्रचार करणार्‍या या वेबसाइट्स विदेशी कलाकारांद्वारे संचालित केल्या जात होत्या आणि त्या डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजरचा वापर करत होत्या.

Centre bans 100 websites involved in organised investment crimes, task-based job frauds
LIC: एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?

कार्ड नेटवर्क, क्रिप्टो करन्सी, परदेशी एटीएममधून पैसे काढणे आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीची रक्कम भारतातून बाहेर काढली जात असल्याचेही उघड झाले आहे. या संदर्भात 1930 हेल्पलाइन आणि NCRP द्वारे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.