Vistara Airlines: विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या; उड्डाण रद्द केल्याने सरकारने विचारले प्रश्न, काय आहे प्रकरण?

Vistara Flight Delay: मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंबामुळे विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे, सरकारने विस्तारा कडून उड्डाण रद्द करणे आणि विलंब झाल्याबद्दल अहवाल मागवला आहे.
Centre Steps In As Vistara Crisis Deepens With More Delays, Cancellations
Centre Steps In As Vistara Crisis Deepens With More Delays, Cancellations Sakal
Updated on

Vistara Flight Delay: मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंबामुळे विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे, सरकारने विस्तारा कडून उड्डाण रद्द करणे आणि विलंब झाल्याबद्दल अहवाल मागवला आहे.

वैमानिकांच्या कमतरतेमुळे या विमान कंपनीने आपली उड्डाणे तात्पुरती कमी केली आहेत. गेल्या काही दिवसांत विस्तारा एअरलाइनने 70 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे.

काय प्रकरण आहे?

विस्तारा एअरलाइनचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी वेतन सुधारणेच्या निषेधार्थ वैद्यकीय रजेवर गेले आहेत, ज्यामुळे एअरलाइनला उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अनेक विमानसेवाही विलंबाने सुरू आहेत. फ्लाइट रद्द होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, विमान कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे.

कंपनीने काय म्हटले?

विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांत विमान कंपनीला क्रूच्या कमतरतेसह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करावी लागली. प्रवक्त्याने सांगितले की परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि लवकरच नियमित कामकाज पुन्हा सुरू होईल.

एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण

अलीकडेच एअर इंडिया-विस्ताराच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आले होते. या अंतर्गत सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सा मिळेल. विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.

Centre Steps In As Vistara Crisis Deepens With More Delays, Cancellations
GST Collection: मार्चमध्ये झाले दुसरे सर्वात मोठे जीएसटी संकलन; 2023-24चे उत्पन्न 1.78 लाख कोटींच्या पुढे

पगाराबाबत वैमानिकांमध्ये नाराजी?

एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सच्या विलीनीकरणाअंतर्गत दोन्ही कंपन्यांच्या क्रूला एकाच पगाराच्या रचनेत आणण्याची तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन प्रणाली अंतर्गत, विस्तारा पायलटना 40 तासांच्या उड्डाणासाठी निश्चित पगार मिळेल.

तसेच, फ्लाइटच्या अतिरिक्त तासांसाठी त्यांना स्वतंत्रपणे पैसे दिले जातील. सध्या विस्तारा वैमानिकांना प्रति फ्लाइट 70 तासांचा पगार दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, विस्तारा एअरलाइन्सचे अनेक पायलट नवीन पगार रचनेमुळे संतप्त झाले आहेत कारण त्यामुळे त्यांचा पगार कमी होणार आहे.

Centre Steps In As Vistara Crisis Deepens With More Delays, Cancellations
Remittances: परदेशी भारतीयांचा मायदेशी पैसे पाठवण्याचा नवा विक्रम, 'या' देशातून आला सर्वाधिक पैसा

विस्तारा एअरलाइन्सच्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंब झाल्याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर यूजर्स कंपनीच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विस्तारा एअरलाइन्सच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंबाबाबत कंपनीकडून उत्तरे मागितली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.