Gold Jewellery: आता 9 कॅरेट सोनेही शुद्ध होणार! हॉलमार्किंग होणार अनिवार्य, काय आहे सरकारचा प्लॅन?

9 Karat Gold Jewellery Hallmarking: सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे 9 कॅरेट, 14 कॅरेट, 18 कॅरेटच्या दागिन्यांची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लवकरच 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले जाऊ शकते.
9 Karat Gold
9 Karat Gold Jewellery HallmarkingSakal
Updated on

9 Karat Gold Jewellery Hallmarking: सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे 9 कॅरेट, 14 कॅरेट, 18 कॅरेटच्या दागिन्यांची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लवकरच 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले जाऊ शकते.

आजकाल, Gen Z मधील कमी कॅरेटच्या दागिन्यांची वाढती मागणी आणि चेन चोरीच्या घटना पाहता, सरकार हे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. भारतीय मानक ब्युरोने (BIS) यापूर्वीच 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. हे नियम 2022 पासून लागू झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.