पुणे : माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील नोकऱ्या आणि पॅकेजची चर्चा सगळीकडे होते. या क्षेत्रात काम करण्यास अनेकांची त्यामुळेच पसंती मिळते. कंपन्यांचा व्यवसाय वाढत असताना प्रमुख व्यक्तींना मोठी पगारवाढ मिळते, पण ‘फ्रेशर्स’ना तुटपुंज्या वाढीवर समाधान मानावे लागते. त्यामुळे अनेक आयटीयन्सच्या पदरी कारकिर्दीच्या प्रारंभीच निराशा पडते.
देशातील बड्या कंपन्यांची त्यांच्या कामकाजाबाबत सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २००९ ते २०२४ अशा दीड दशकांच्या अर्थात १५ वर्षांच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीर्इओ) पगारात ९०० ते तब्बल सात हजार टक्के वाढ झाली, पण याच काळात ‘फ्रेशर्स’च्या वार्षिक पगारात केवळ एक लाख रुपयांच्या घरात वाढ झाली.