इस्रोचा मोठा खुलासा! चांद्रयान 3 च्या यशाचा फायदा बेरोजगारांना, देशात अशा निर्माण झाल्या 45,000 नोकऱ्या

Chandrayaan-3 Success: चांद्रयान 3 ने विद्यार्थ्यांना अंतराळ उद्योगात करिअर करण्याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.
इस्रोचा मोठा खुलासा! चांद्रयान 3 च्या यशाचा फायदा बेरोजगारांना, देशात अशा निर्माण झाल्या 45,000 नोकऱ्या
Updated on

Chandrayaan-3 Success: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे, अंतराळात आपली ताकद सिद्ध करणाऱ्या जगातील टॉप 4 देशांमध्ये भारत सामील झाला आहे. चांद्रयान-3 च्या यशापेक्षा त्याच्या किफायतशीर बजेटकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

हॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी बजेटमध्ये भारत चंद्रावर पोहोचला. आता या मोहिमेच्या यशानंतर संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे आशेने लागले आहेत. चांद्रयान 3 च्या कमी बजेटमुळे इस्रोच्या या मिशनमध्ये अमेरिका, चीन, रशियासह जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे.

चांद्रयानच्या यशानंतर आता इतर विषयांवर चर्चा होत आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, 23 ऑगस्ट रोजी (चांद्रयान-3 च्या चंद्रावर उतरल्यानंतर 26 मिनिटांनी) भारतात 'स्पेस' या शब्दासाठी इंटरनेट सर्चचे प्रमाण वाढले आहे.

'स्पेस' सोबतच, 'स्पेस जॉब्स', 'इस्रो जॉब्स' आणि 'स्पेस करिअर्स' सारखे सर्च कीवर्ड देखील 23-24 ऑगस्टच्या सुमारास वाढले होते. याचा अर्थ चांद्रयान 3 ने हजारो भारतीयांना, बहुतेक विद्यार्थ्यांना, अंतराळ उद्योगात करिअर करण्याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.

इस्रोचा मोठा खुलासा! चांद्रयान 3 च्या यशाचा फायदा बेरोजगारांना, देशात अशा निर्माण झाल्या 45,000 नोकऱ्या
AI मुळे लोकांचे जॉब जाणार नाहीत, पण...; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमधून दिलासादायक निष्कर्ष

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इस्रोच्या नुकत्याच आलेल्या नोटमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. इस्रो आणि त्यांच्याशी निगडीत खाजगी क्षेत्राकडून सुरू असलेल्या उपक्रमांमुळे देशात हजारो नोकऱ्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चांद्रयान 3 च्या यशामुळे भारतीय खाजगी अवकाश क्षेत्रात अधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात हे स्पष्ट आहे. तज्ञांच्या मते, देशात डझनहून अधिक कंपन्या आणि 500 ​​हून अधिक लघु मध्यम उद्योग आहेत जे संरक्षण आणि एरोस्पेसशी संबंधित व्यवसायात गुंतलेले आहेत.

इस्रो सध्या आणखी अंतराळ मोहिमांवर काम करत आहे किंवा सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात आणखी नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

इस्रोचा मोठा खुलासा! चांद्रयान 3 च्या यशाचा फायदा बेरोजगारांना, देशात अशा निर्माण झाल्या 45,000 नोकऱ्या
Chandrayaan 3: चांद्रयान-3 चा पहिला शोध, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान किती? विक्रम लँडरने सांगितले...

इस्रोने नोकऱ्यांबाबत काय म्हटले?

फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अंतराळ उद्योगात भारतात किती नोकऱ्या निर्माण होतात याविषयी कोणताही अहवाल नाही. इस्रोने अलीकडेच एका नोटमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या सततच्या मोहिमांमुळे 500 हून अधिक MSME, PSU आणि मोठ्या खाजगी उद्योगांसह एक इकोसिस्टम तयार केली गेली आहे.

अंतराळ कार्यक्रमात भारत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. इस्रोने आपल्या नोटमध्ये पुढे म्हटले आहे की अंतराळ उद्योगांच्या सहभागामुळे देशातील सुमारे 45,000 लोकांसाठी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. संरक्षण उत्पादन, दूरसंचार, साहित्य, रसायन आणि अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांना याचा खूप फायदा झाला आहे.

इस्रोचा मोठा खुलासा! चांद्रयान 3 च्या यशाचा फायदा बेरोजगारांना, देशात अशा निर्माण झाल्या 45,000 नोकऱ्या
Chandrayaan 3 Update : चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर? इस्रोने पोस्ट केला 'चांद्रयान-3'चा नवा व्हिडिओ

'या' उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या

आयआयटी जोधपूरचे प्रोफेसर अरुण कुमार यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालात म्हटले आहे की, इस्रो व्यतिरिक्त, नवीन स्टार्ट-अप्सच्या आगमनामुळे अवकाश उद्योगात अनेक नोकऱ्या आहेत.

ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की, अवकाश उद्योगासाठी उपयुक्त असलेल्या नोकऱ्या क्षेपणास्त्र, रडार आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आहेत. जर त्यांना अवकाश उद्योगात नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत तर संबंधित उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.