‘पीपीएफ’च्या नियमात बदल

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची सुरक्षित आणि उच्च परतावा देणारी सरकारी योजना आहे.
Changes in PPF rules investment government scheme
Changes in PPF rules investment government schemesakal
Updated on

- ॲड. प्रतिभा देवी

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची सुरक्षित आणि उच्च परतावा देणारी सरकारी योजना आहे. ही योजना टपाल खात्यामार्फत आणि निवडक बँकांर्माफत चालवली जाते. ‘पीपीएफ’ खात्यात दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते.

या योजनेतील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करसवलत मिळते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रथम पसंती असते. अशा या लोकप्रिय योजनेच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, हे बदल एक ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहेत. अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) खाते, अल्पवयीन व्यक्तीचे खाते आणि एकापेक्षा जास्त खाती याबाबतच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

‘एनआरआय’साठी महत्त्वपूर्ण बदल

मुदतवाढ नाही : ‘पीपीएफ’ खाते असलेले अनिवासी भारतीय ते खाते परिपक्व होईपर्यंत चालू ठेवू शकतात परंतु, त्याची मुदतवाढ त्यांना मिळू शकत नाही. उदा. एखाद्या व्यक्तीने २०१० मध्ये ‘पीपीएफ’ खाते उघडले आणि नंतर ती व्यक्ती २०१५ मध्ये परदेशात गेली आणि तिथे स्थायिक झाली, तर या योजनेची १५ वर्षांची मुदत पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०२५ पर्यंत ते सुरू राहू शकते. परंतु, त्याची मुदत पुढे वाढवता येणार नाही.

मुदतीपूर्वी खाते बंद करणे : अनिवासी भारतीय आता त्यांचे ‘पीपीएफ’ खाते उघडल्यापासून पाच आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदतीआधी बंद करू शकतात.

व्याजदर : रहिवासी आणि अनिवासी भारतीयांसाठी व्याजदर समान आहे. परंतु, अनिवासी भारतीयांच्या वास्तव्याचा देश आणि भारतासोबतचा दुहेरी कर टाळण्याचा करार (डीटीएए) यावर आधारित कर परिणाम भिन्न असू शकतात.

ऑनलाइन सुविधा : अनिवासी भारतीयांना आता परदेशातून ‘पीपीएफ’ खाते ऑनलाइन वापरता येईल. त्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत.

एकापेक्षा जास्त खाती असल्यास...

एकापेक्षा जास्त ‘पीपीएफ’ खाती असतील, तर प्राथमिक खात्यावरील रकमेवर ‘पीपीएफ’ योजनेच्या व्यादरानुसार व्याज मिळेल; तसेच दुसऱ्या खात्यातील शिल्लक राहिलेली रक्कम प्राथमिक खात्यात विलीन केली जाईल.

प्राथमिक खात्यातील वार्षिक मर्यादेच्या आत असलेल्या रकमेवर ‘पीपीएफ’ योजनेचा व्याजदर मिळेल. अतिरिक्त खात्यावर खाते उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्क्याने व्याजदर मिळेल. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली, तरी ‘पीपीएफ’ योजनेंतर्गत एकाच खात्यावर व्याज मिळणार आहे अल्पवयीन व्यक्तीचे खाते

अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या ‘पीपीएफ’ खात्यात जमा रकमेवर त्या व्यक्तीच्या १८ वर्षांपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खाते योजनेप्रमाणे व्याज मिळेल. अल्पवयीन खातेदाराला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘पीपीएफ’ योजनेचा व्याजदर लागू होईल. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या ‘पीपीएफ’ खात्यांचा मुदतपूर्ती कालावधी अल्पवयीन व्यक्ती प्रौढ झाल्याच्या तारखेपासून मोजण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.