Charlie Munger Passes Away: वॉरेन बफे यांचे विश्वासू सल्लागार चार्ली मुंगेर यांनी वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Charlie Munger Death: अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Charlie Munger, investing genius and Warren Buffett's right-hand man, dies at age 99
Charlie Munger, investing genius and Warren Buffett's right-hand man, dies at age 99 Sakal
Updated on

Charlie Munger Death: प्रसिद्ध गुंतवणूक फर्म बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर यांचे 28 नोव्हेंबर रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार्ली मॅनेजर हे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफे यांचे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांना ओळखले जात होते.

1924 साली जन्मलेल्या चार्ली मुंगेर यांनी नवीन वर्षात वयाची 100 वर्षे पूर्ण केली असतील. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या चार्ली यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात विशेष प्राविण्य होते.

वॉरेन बफेसोबत काम सुरू करण्यापूर्वी चार्ली मुंगेर त्यांच्या इतर भागीदारांसोबत मुंगेर, टोलेस अँड ओल्सन नावाची लॉ फर्म चालवत होते. 1978 मध्ये, ते वॉरन बफेट आणि बर्कशायर हॅथवेमध्ये सामील झाले. हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये शिकलेल्या मुंगेर यांनी हवामानशास्त्रातही पदवी घेतली होती.

Charlie Munger, investing genius and Warren Buffett's right-hand man, dies at age 99
PhonePe Loans: नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन सुविधा; अनेक बँकांशी हातमिळवणी

बर्कशायर हॅथवेची स्थापना करून ती पुढे नेण्यात चार्ली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वॉरन बफे यांना मुंगेर यांच्या सल्ल्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्या आधारावर ते कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असत.

फोर्ब्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चार्ली 182 व्या क्रमांकावर होते त्यांची संपत्ती 2.6 अब्ज डॉलर्स आहे. मुंगेर हे केवळ बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष नव्हते तर ते रिअल इस्टेट वकील, डेली जर्नल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि प्रकाशक, कॉस्टको बोर्ड सदस्य, आर्किटेक्ट देखील होते.

Charlie Munger, investing genius and Warren Buffett's right-hand man, dies at age 99
Tata Group: अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! 1,750 कोटी देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

चार्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना वॉरन बफे म्हणाले की बर्कशायर हॅथवेच्या यशात चार्ली यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. वॉरन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की चार्ली मुंगेर यांच्या सहभागाशिवाय आणि सल्ल्याशिवाय बर्कशायर हॅथवे कंपनी मोठ्या पदावर पोहचू शकली नसती. कंपनीला मोठे करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जी कायम स्मरणात राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.