Chicken Prices: पोल्ट्री उद्योगाची चिंता वाढली! चिकनच्या भावात मोठी घसरण; काय आहे कारण?

Chicken Prices: देशभरात कोंबड्यांचे भाव कोसळले आहेत.
Chicken prices crash as production exceeds demand
Chicken prices crash as production exceeds demandSakal
Updated on

Chicken Prices: हिवाळ्यात चिकन सर्वाधिक खाल्ले जाते त्यामुळे या हंगामात चिकनच्या किंमती वाढतात पण यावेळी हवामानातील बदलामुळे कमी मागणी आणि अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे देशभरात कोंबड्यांचे भाव कोसळले आहेत. फार्मगेटचे भाव काही महिन्यांपूर्वी सुमारे 110 रुपये प्रति किलोवरून 60 रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाची चिंता वाढली आहे.

तामिळनाडू अंडी पोल्ट्री फार्मर्स मार्केटिंग सोसायटीच्या (TNEPFMS) अध्यक्षा वांगीली सुब्रमण्यन यांनी बिझनेसलाइन या वृत्तसंस्थेला सांगितले की, यावेळी उत्पादन जास्त होते आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये कार्तिगाई या शुभ महिन्यात सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरू होतो त्यामुळे विक्री कमी झाली आहे.

गेल्या काही दिवसांत किंमती 80 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत आणि लवकरच त्या 100 रुपये प्रति किलोवर जाऊ शकतात.

केंद्र सरकारने 2019 मध्ये केलेल्या पशुधन गणनेनुसार, देशातील एकूण पोल्ट्रीची संख्या 851.81 दशलक्ष आहे, जी मागील जनगणनेच्या तुलनेत 16.8 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये 534.74 दशलक्ष व्यावसायिक कुक्कुटपालन करणाऱ्यांचा समावेश आहे तर उर्वरित 317 दशलक्ष घरातील पोल्ट्रींची संख्या आहे.

Chicken prices crash as production exceeds demand
Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकावर; अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर वाढल्याचा परिणाम

उत्पादन खर्चात वाढ

गेल्या पाच वर्षांत उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. खाद्याची किंमत (मका, सोया आणि तुटलेला तांदूळ) दुपटीने वाढली आहे. सध्याची किंमत पोल्ट्री उद्योगाला परवडणारी नाही. कर्नाटकमध्ये, गेल्या 45 दिवसांपासून पोल्ट्री उद्योगात घसरण होत आहे. मागणीत झालेली घट आणि उत्पादकता वाढल्याने किंमतीत घसरण झाली आहे.

Chicken prices crash as production exceeds demand
Adar Poonawalla House: इंग्रजांच्या लंडनमध्ये पुणेकराने घेतलं सर्वात महागडे घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

केरळमधील किरकोळ बाजारात ब्रॉयलर चिकनचे दर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 130 रुपयांच्या तुलनेत 103-106 रुपयांंवर आले आहेत. केरळमध्ये एका आठवड्यात एक कोटी किलो ब्रॉयलर कोंबडीचा वापर होतो, परंतु वाढत्या उत्पादन खर्चामुळे पक्षी पाळण्यात अडचणी येत असलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.