Citigroup: अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. वर्षाच्या तिसर्या तिमाहीत, सिटीग्रुपने 2,000 लोकांना कामावरून काढून टाकले होते. या वर्षी आतापर्यंत या ग्रुपने 7,000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे.
कर्मचाऱ्यांची नोकरी संपत असताना कंपनीकडून त्यांना severance शुल्क दिले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, severance शुल्क 650 दशलक्ष डॉलर आहे.
सिटीग्रुपचे सीएफओ मार्क मेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये severance शुल्क 450 दशलक्ष डॉलर होते. त्यानंतर 5,000 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.
त्यातच कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे. कंपनी आता 10 टक्के कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहे. असे वृत्त CNBC ने दिले आहे.
आगामी काळात आणखी लोकांना कामावरून कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे. मात्र, अद्याप पूर्ण आकडा कळू शकलेला नाही. सिटी ग्रुपने कर्मचारी कपात केल्यानंतरही, फर्ममध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या 2,40,000 आहे.
सिटी ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा खर्च 6 टक्क्यांनी वाढून 13.5 अब्ज डॉलर झाला आहे. कंपनी सध्याच्या परिस्थितीत खर्च कमी करण्याचा विचार करत आहे.
गेल्या वर्षी इतके लोक बेरोजगार झाले
2023 मध्ये आतापर्यंत टेक कंपन्यांनी 2.26 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. हा आकडा धक्कादायक आहे. कारण गेल्या वर्षी कर्मचारी कपातीचा विक्रम नोंदवला गेला होता आणि 2022 मध्ये टेक कंपन्यांनी सुमारे 2 लाख लोकांना कामावरून काढून टाकले होते.
'या' कारणांमुळे कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागत आहे
कर्मचारी कपातीमध्ये जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये गुगल, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन यांचीही नावे आहेत. सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कर्मचारी कपातीला अनेक कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चितता हे याचे सर्वात मोठे कारण आहे, तर जगभरातील महागाई वाढ, पुरवठा साखळीतील आव्हाने आणि विक्रीतील घसरण यामुळे कंपन्यांच्या समस्याही वाढत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.