Unemployment Rate: देशात तिसऱ्यांदा बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांहून अधिक, ग्रामीण भागात सर्वात वाईट स्थिती

देशातील बेरोजगारीचा सरासरी दर पुन्हा एकदा 8 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
Unemployment in India
Unemployment in IndiaSakal
Updated on

Unemployment Rate: देशातील बेरोजगारीचा सरासरी दर पुन्हा एकदा 8 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. देशातील बेरोजगारीचा सरासरी दर 8 टक्क्यांनी वाढण्याची या वर्षातील गेल्या 6 महिन्यांत ही तिसरी वेळ आहे.

अहवालानुसार, ग्रामीण भागात हंगामी बेरोजगारीमुळे भारतातील बेरोजगारीचा दर या वर्षी तिसऱ्यांदा 8 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे शहरी भागातील बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे.

शहरी भागातील बेरोजगारी दर कमी

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट लिमिटेडच्या अहवालानुसार, जूनमध्ये बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील 7.68 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या महिन्यात, शहरी भागातील बेरोजगारी 7.87% पर्यंत खाली आली होती, तर ग्रामीण भारतामध्ये दोन वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी 8.73% इतकी होती.

Unemployment in India
Life Insurance: विमा एजंटने चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली आहे? अशी मिळेल पूर्ण रक्कम, काय सांगतो कायदा?

जूनमध्ये बेरोजगारी का वाढते?

देशाच्या ग्रामीण लोकसंख्येसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या कृषी क्षेत्रासाठी जून महिना हा सामान्यत: कठीण काळ समजला जातो.

भारतातील खेड्यांमधील बेरोजगारी ऐतिहासिकदृष्ट्या जूनमध्ये वाढते कारण मे महिन्यात कापणी संपते आणि नवीन पिकांची पेरणी जुलैमध्ये होते जेव्हा मान्सून पुढे जातो.

बेरोजगारीची चिंता

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियाचा डेटा मोदी सरकारची चिंता वाढवू शकतो, नऊ महिन्यांनंतर 2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. तसचं रोजगाराच्या घटत्या संधी आणि वाढत्या बेरोजगारीवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेराव घातला आहे.

एकीकडे सरकार उत्कृष्ट स्थूल आर्थिक डेटाबाबत स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात कोणतीही कसर सोडत नाही. परंतु दोन तृतीयांश लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात बेरोजगारी वाढल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

Unemployment in India
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.