Salary Increment Expectation In India: जागतिक सल्लागार कंपनी मर्सरच्या नवीन सर्वेक्षणानुसार, 2024 मध्ये भारतातील सरासरी वेतन वाढ 10 टक्के अपेक्षित आहे, जी गेल्या वर्षी 9.5 टक्के होती. सर्वेक्षणानुसार, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्तीत जास्त 9.7 ते 10 टक्के वाढ होऊ शकते. सर्वेक्षणानुसार, ग्राहक आणि रिटेल क्षेत्रात सर्वात कमी 9.5 टक्के वाढ होऊ शकते .
सर्वेक्षणानुसार, भारतातील स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्यांचा दर 2021 मध्ये 12.1 टक्क्यांवरून 2022 मध्ये 13.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 2023मध्ये नोकऱ्या सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. (Companies To Dole Out 10 percent Average Salary Hike This Year Says Survey)
यावरून दरवर्षी स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. ब्राझील, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह जगाच्या इतर भागांमध्येही असाच ट्रेंड दिसून येतो. भारतात केलेल्या सर्वेक्षणात 1,474 कंपन्यांकडून डेटा जमा करण्यात आला, ज्यामध्ये 6,000 हून अधिक नोकरीच्या पदांचा समावेश आहे. (Companies in India are expected to dole out an 10 percent average salary increase In 2023 Says survey)
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार भारत चांगल्या वाढीच्या मार्गावर आहे. ही अपेक्षित वेतनवाढ भारतीय बाजारपेठेतील आत्मविश्वास आणि आशावाद सिद्ध करते. एआय आणि ऑटोमेशनवरील वाढत्या वापरामुळे ऑटोमोबाईल, उत्पादन आणि अभियांत्रिकी आणि विज्ञान यासारख्या प्रमुख उद्योगांना नवीन टप्प्यावर नेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.