Employment News: दुप्पट पगार देण्यास कंपन्या तयार, पण कर्मचारी मिळेनात, 'या' क्षेत्रात 51% पदे रिक्त

काही टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना काढून टाकले असेले तरी 'या' क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवर याचा परिणाम झालेला नाही.
Employment News
Employment NewsSakal
Updated on

Artificial Intelligence Jobs In India: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सध्या चर्चेत आहे. यामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी एआय टूल्स विकसित करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहे. याचा परिणाम असा झाला आहे की जगभरात AI मधील तज्ञ अभियंत्यांची मागणी वाढली आहे.

भारतही या स्पर्धेपासून लांब नाही. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज म्हणजेच NASSCOM म्हणते की 51 टक्के AI अभियंते भारतात गरजेपेक्षा कमी आहेत. देशात सध्या 4.16 लाख AI अभियंते आहेत. अजून 2.13 लाख अतिरिक्त एआय अभियंत्यांची गरज आहे.

भारताला जागतिक तंत्रज्ञान उद्योगाचे बॅक ऑफिस म्हटले जाते. पण भारतालाही ही मागणी-पुरवठ्यातील तफावत भरून काढता आलेली नाही.

नॅसकॉमच्या मते, जगातील एआय टॅलेंटमध्ये 16 टक्के वाटा असलेल्या, अमेरिका आणि चीनसह भारत जगातील तीन टॉप टॅलेंट मार्केटमध्ये आहे. अत्यंत कुशल AI, मशीन लर्निंग आणि बिग डेटा टॅलेंटचा जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा भारताचा आहे.

एआय इंजिन बनवण्यात गुंतलेल्या टेक कंपन्या:

Google, Baidu आणि Microsoft सह जवळजवळ प्रत्येक टेक कंपनी AI इंजिन बनवण्यात गुंतलेली आहे. याचा परिणाम म्हणजे सिलिकॉन व्हॅलीपासून बंगळुरूपर्यंत एआय इंजिनिअर्सची मागणी गगनाला भिडली आहे.

गेल्या काही महिन्यांत, काही टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना काढून टाकले असेले तरी AI मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवर याचा परिणाम झालेला नाही.

Employment News
Gold Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

दुप्पट पगार देण्यास कंपन्या तयार:

यावेळी AI तज्ञांना भरपूर पगार मिळत आहे. ते 30-50 टक्के वाढीसह नोकऱ्या बदलत आहेत. एआय अभियंत्यांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या त्यांना चांगला पगार देण्यास तयार आहेत. यामुळेच एआय इंजिनिअर्स दुप्पट पगारासाठी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात आहेत.

आरोग्यसेवा, वित्त आणि मनोरंजन कंपन्यांमध्येही एआयची मागणी वाढू लागली आहे. परंतु, एआय अभियंते मिळत नाहीत. गेल्या वर्षी भारतात 66 नवीन टेक इनोव्हेशन केंद्रे उघडली गेली आहेत. त्यांना ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (CGC) किंवा कॅप्टिव्ह म्हणतात. आता त्यांची भारतातील एकूण संख्या 1600 च्या जवळपास झाली आहे.

Employment News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.