Income Tax: ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठ नुकसान

Income Tax: 2023-24 हे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकजण कर वाचवण्यासाठी धडपडत आहे. यंदा कर वाचवण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला या वर्षी बचत करायची असेल, तर 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करा
Complete These Important Financial Tasks Before March 31st 2024
Complete These Important Financial Tasks Before March 31st 2024 Sakal
Updated on

Income Tax: 2023-24 हे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकजण कर वाचवण्यासाठी धडपडत आहे. यंदा कर वाचवण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला या वर्षी कर बचत करायची असेल, तर 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करा कारण नवीन आर्थिक वर्ष 2024-25 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. 31 मार्चपूर्वी करबचतीच्या गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

1. आयटीआर दाखल करणे

आर्थिक वर्ष 2020-21 (AY 2021-22) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. ज्यांनी याआधी आर्थिक वर्षासाठी त्यांचे रिटर्न भरणे चुकवले आहे, त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग त्यांनी रिटर्नमध्ये दाखवला नाही किंवा आधी भरताना चुकीचे उत्पन्न तपशील दिले आहेत. अशा व्यक्तींनी अपडेट आयटीआर दाखल करावा.

2. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर-बचत गुंतवणूक करा

जर तुम्ही जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर-बचत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला ती 31 मार्च 2024 पूर्वी करावी लागेल. सेक्शन 80C अंतर्गत भरपूर कर-बचत साधने आहेत.

Complete These Important Financial Tasks Before March 31st 2024
Tax Saving: 1.5 लाखांपर्यंत कर वाचवण्याची शेवटची संधी; बँकेची ही लोकप्रिय योजना ठरेल फायदेशीर

जसे की सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) आणि मुदत ठेवी ज्या तुम्हाला तुमची कर-बचत करण्यात मदत करू शकतात.

आरोग्य विमा, शैक्षणिक कर्ज आणि गृहकर्ज यांसारखे खर्च या काही इतर तरतुदी आहेत ज्या तुम्हाला कर कपात मिळवून देऊ शकतात आणि तुमचे कर दायित्व कमी करू शकतात.

3. किमान गुंतवणूक मर्यादा

PPF किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या सरकारी बचत योजनांना एका वर्षात अनुक्रमे 500 रुपये आणि 250 रुपये किमान गुंतवणूक आवश्यक आहे. तुम्ही आर्थिक वर्षात ही किमान ठेव ठेवली नसल्यास, तुमचे खाते डीफॉल्ट केले जाऊ शकते, ज्यामुळे दंड आकारला जाऊ शकतो.

त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल परंतु या आर्थिक वर्षात त्यामध्ये पैसे जमा केले नाहीत, तर तुमच्याकडे डिफॉल्ट दंड टाळण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत वेळ आहे.

Complete These Important Financial Tasks Before March 31st 2024
Electoral Bonds: वैयक्तिक मालमत्तेतून 'या' 10 उद्योगपतींनी खरेदी केले कोट्यवधींचे इलेक्टोरल बाँड; कोण आहेत ते?

4. फास्टॅग KYC

नुकत्याच केलेल्या घोषणेमध्ये, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वापरकर्त्यांना त्यांचे FASTag KYC तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे.

तुम्ही तुमचे FASTag KYC तपशील अपडेट करण्यासाठी इंडियन नॅशनल हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) पोर्टल किंवा नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) वेबसाइटला भेट देऊ शकता.

नोंद -  क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.