चार ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा दावा फोल? काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या 'त्या' ट्विटवर केंद्र सरकारचे मौन

भाजप नेत्यांच्या दाव्यावर केंद्र सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Congs Jairam Ramesh Lashes Out At BJP Leaders For Sharing Fake News About Indias GDP Crossing USD 4 Trillion
Congs Jairam Ramesh Lashes Out At BJP Leaders For Sharing Fake News About Indias GDP Crossing USD 4 Trillion Sakal
Updated on

नवी दिल्ली, ता. 20: भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) चार हजार अब्ज डॉलर (चार ट्रिलियन)झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी केल्याने त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी हा दावा फोल असल्याचे म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या या दाव्यावर केंद्र सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

उद्योजक गौतम अदानी यांच्यासह भाजपचे तेलंगण आणि राजस्थानमधील काही केंद्रीय मंत्री तसेच नेत्यांनी देशाची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन झाल्याचा दावा केला होता. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सध्याची भारताची या आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्था 3.60 ट्रिलियन एवढी होण्याची शक्यता आहे.

चार ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी अजूनही पल्ला गाठायचा आहे. परंतु भाजपच्या नेत्यांनी रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान विश्वकरंडकाचा अंतिम सामना सुरू असताना असे दावे केले होते, की भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाने चार ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे. प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याने राजकीय पातळीवर खळबळ उडाली.

याबाबत काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांनी भाजपच्या नेत्यांवर एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. ही संपूर्ण खोटी व बोगस बातमी आहे. ‘‘स्वतःच्या आनंदासाठी ‘हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि खोट्या बातम्या पसरविण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे’ असे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Congs Jairam Ramesh Lashes Out At BJP Leaders For Sharing Fake News About Indias GDP Crossing USD 4 Trillion
भारतातील सर्वात महागडा घटस्फोट; नवाज मोदींनी रेमंडच्या मालकाकडे केली 'इतक्या' कोटींची मागणी

आकडेवारी काय सांगते?

2022-23 या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, भारताचा वास्तविक GDP 272.41 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये डॉलर टर्म ग्रोथ जोडल्यास एकूण GDP 3.3 ट्रिलियन डॉलर होईल.

FY24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, भारताचा GDP 301.75 लाख कोटी रुपये असेल. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वार्षिक वाढ सुमारे 10.5% आहे. यासह भारताची एकूण अर्थव्यवस्था 3.6 ट्रिलियन डॉलर आहे असा अंदाज आहे.

विश्लेषकांचे काय मत आहे?

बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ राहुल बाजोरिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहितात या आर्थिक वर्षात, भारताचा जीडीपी 300 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, जो अंदाजे 3.65 ट्रिलियन डॉलर आहे.

Congs Jairam Ramesh Lashes Out At BJP Leaders For Sharing Fake News About Indias GDP Crossing USD 4 Trillion
Insta Reels: इंस्टाग्राम रील्समुळे चक्क सौंदर्य प्रसाधनांच्या खरेदीत होतीय मोठी वाढ; अहवालात माहिती उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.