Veg Thali Price: शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?

Veg, Non-Veg Thali Price: यंदा मे महिन्यात शाकाहारी जेवण महाग झाले आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमती वाढल्या आहेत, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली आहे.
Veg Thali
Vegetarian thali became costlier, non-veg cheaper Report Sakal
Updated on

Veg, Non-Veg Thali Price: यंदा मे महिन्यात शाकाहारी जेवण महाग झाले आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमती वाढल्या आहेत, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली आहे. शाकाहारी थाळीमध्ये रोटी, भात, डाळ, दही, कोशिंबीर सोबत कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीमध्ये शाकाहारी थाळीसारखेच अनेक पदार्थ असतात. पण डाळींऐवजी चिकन (ब्रॉयलर) आहे. या थाळीची सरासरी किंमत उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील या थाळीमध्ये समाविष्ट असलेल्या खाद्यपदार्थांच्या किमतींवर आधारित आहे.

मे महिन्यात शाकाहारी थाळी किती महाग झाली?

'रोटी राइस रेट' नावाची रेटिंग एजन्सी क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, शाकाहारी थाळीची किमत गेल्या वर्षी मे महिन्यात 25.5 रुपये होती, जी या वर्षी याच महिन्यात 27.8 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या वर्षीच्या मेच्या तुलनेत या मे महिन्यात शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महाग झाली आहे.

Veg Thali
MP Salary: खासदारांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

शाकाहारी थाळी महाग होण्यामागचे कारण काय?

क्रिसिलच्या या अहवालानुसार, शाकाहारी थाळी महाग होण्याचे कारण म्हणजे बटाटे, टोमॅटो, कांदा, तांदूळ आणि डाळींच्या किमतीत झालेली वाढ. वार्षिक आधारावर टोमॅटोच्या किमतीत 43 टक्के, बटाट्याच्या 41 टक्के आणि कांद्याच्या किमतीत 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शाकाहारी थाळीमध्ये 13 टक्के वाटा असलेला तांदूळही 13 टक्क्यांनी महाग झाला आहे. या थाळीचा 9 टक्के वाटा असलेल्या डाळींच्या किमती वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, जिरे 37 टक्के, मिरची 25 टक्के आणि खाद्यतेल 8 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे शाकाहारी थाळीचे भाव आणखी वाढले नाहीत.

मांसाहारी थाळी किती स्वस्त झाली?

मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. क्रिसिलच्या या अहवालानुसार, या वर्षी मे महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत 55.9 रुपये होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 59.9 रुपयांच्या किंमतीपेक्षा 7 टक्के कमी आहे. मासिक आधारावर, मांसाहारी थाळीच्या किमतीत केवळ एक टक्क्यांनी घट झाली आहे. मांसाहारी थाळीतील अनेक खाद्यपदार्थ हे शाकाहारी थाळीसारखेच असतात. पण डाळींऐवजी ब्रॉयलर आहे.

Veg Thali
RBI MPC: निवडणूक निकालानंतर RBIची पहिली बैठक; EMI वर उद्या होणार निर्णय

मांसाहारी थाळी का झाली स्वस्त?

मांसाहारी थाळी स्वस्त असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ब्रॉयलरची कमी किमत. क्रिसिलच्या या अहवालानुसार, या वर्षी मे महिन्यात वार्षिक आधारावर ब्रॉयलरच्या किमतीत 16 टक्क्यांनी घट झाली आहे. ब्रॉयलरची किमत मांसाहारी थाळीच्या किमतीच्या जवळपास 50 टक्के आहे.

त्यामुळे ब्रॉयलरच्या किमती घसरल्याने मांसाहारी थाळीही वर्षानुवर्षे स्वस्त झाली आहेत. मासिक आधारावर म्हणजेच मे महिन्यात मांसाहारी थाळीच्या किमती एप्रिलच्या तुलनेत केवळ 1 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.