क्रिकेट विश्‍वचषक आणि गुंतवणूक

केट आणि गुंतवणूक यातील साधर्म्य बहुतेकांना माहिती असते. परंतु, क्रिकेट विश्‍वचषक जिंकणे ही एक मोठी प्रक्रिया आणि तपस्या आहे आणि तसेच आपण गुंतवणुकीकडे पाहिले, तर संपत्ती निर्माण करणे सुलभ होईल.
क्रिकेट विश्‍वचषक आणि गुंतवणूक
क्रिकेट विश्‍वचषक आणि गुंतवणूकsakal
Updated on

अर्थभान

सुहास राजदेरकर

केट आणि गुंतवणूक यातील साधर्म्य बहुतेकांना माहिती असते. परंतु, क्रिकेट विश्‍वचषक जिंकणे ही एक मोठी प्रक्रिया आणि तपस्या आहे आणि तसेच आपण गुंतवणुकीकडे पाहिले, तर संपत्ती निर्माण करणे सुलभ होईल.

संयम आणि शिस्त

एका विशिष्ट वेळी भारताला जिंकण्याची अवघी तीन टक्के शक्यता असतानासुद्धा धीर न सोडता, संयम, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर मॅच आपल्या बाजूने फिरविण्याचे कौशल्य आपल्या खेळाडूंनी दाखविले. गुंतवणुकीमध्येसुद्धा बरेच वेळा संयम, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर यश मिळवता येते. एखादी चांगली संकल्पना किंवा योजना किंवा शेअर यामध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित काळात अपेक्षित परतावा देत नाही. अशा वेळी चुकीच्या वेळेला ती गुंतवणूक मोडण्यापेक्षा संयम ठेवला, तर योग्य परतावा मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा. वीज, ऊर्जा क्षेत्रातील योजना आणि शेअर दीर्घकाळ कोणतीही खास कामगिरी करीत नव्हते. परंतु, मागील दोन ते तीन वर्षांपासून, विशेषतः कोविड काळानंतर या योजना आणि शेअर यांनी खूप मोठा परतावा दिला. उदा. एनटीपीसी, पॉवर ग्रिड, आरईसी, एसजेव्हीएन आदी. जुलै २०२१ मध्ये ११५ रुपये किंमत असलेला ‘एनटीपीसी’ आज ३८० रुपये आहे. याच काळात ‘एसजेव्हीएन’ २७ रुपयांवरून १५० रुपयांवर गेला. त्याचप्रमाणे या संकल्पनेवर आधारित म्युच्युअल फंडांच्या योजना याच काळात दुपटीपेक्षा जास्त वाढल्या. वॉरेन बफेटसारख्या महान गुंतवणूक गुरूंनीसुद्धा त्यांची ८० टक्के संपत्ती ही त्या गुंतवणुकीच्या शेवटच्या २० टक्के काळात केली.

विकेंद्रीकरण (डायव्हर्सिफिकेशन)

क्रिकेट संघातील ११ खेळाडूंपैकी काही जण अयशस्वी ठरतात परंतु, इतर चमकदार कामगिरी करतात. शेवटच्या मॅचमध्ये रोहितची दमदार बॅटिंग होऊ शकली नाही. परंतु. खास यशस्वी न ठरलेल्या आणि संपूर्ण मालिकेमध्ये फक्त ७५ धावा बनविलेल्या विराट कोहलीने मात्र, ७६ धावा काढून देशाला विजय मिळवून दिला. गुंतवणुकीमध्येसुद्धा एकाच विभागामध्ये सर्व गुंतवणूक न करता ती विविध योजनांमध्ये केली आणि एखाद्या योजनेची किंवा विभागाची कामगिरी चांगली झाली नाही आणि दुसरा विभागाने चांगली कामगिरी केली, तर अपेक्षित परतावा मिळण्यात यश येते.

अनुभवी सल्लागाराची मदत

राहुल द्रविड यांची ‘क्रिकेट टीम कोच’ (प्रशिक्षक) भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. खेळाडूंनी नक्की कोणत्या दिशेने जायचे आहे, त्यांचे नियोजन आणि डावपेच काय असले पाहिजेत, काय आणि कशी मेहनत करायची आहे. आदी अनेक गोष्टी सामना जिंकण्यासाठी कारणीभूत ठरल्या. सूर्यकुमार यादवचा जो कॅच आपण पाहिला त्याच कॅचची प्रॅक्टिस राहुल द्रविड यांनी त्याच्याकडून १५० ते २०० वेळा करून घेतली होती. काही वेळा आधी ठरवलेले नियोजन आयत्या वेळी बदलावे लागते, जसे की अक्षर पटेलला फलंदाजीसाठी आधीच पाठविणे उपयोगी पडले किंवा उपांत्य फेरीमध्ये अर्शदीपला पहिल्याच षटकानंतर थांबवून अक्षरसारख्या फिरकी गोलंदाजाला आणणे. गुंतवणुकीमध्येसुद्धा विभागीय योजनांमधील व ‘एनएफओ’मधील गुंतवणूक ही जास्त जोखमीची असते, त्यामुळे बहुतेक सल्लागार ती करू नका असा सल्ला देतात. परंतु, जेव्हा एचडीएफसी म्युच्युअल फंडाने देशातील पहिला डिफेन्स फंड आणला, तेव्हा त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला योग्यच होता. या योजनेने एका वर्षात दुपटीच्या वर परतावा दिला आहे. अर्थात, कधी, किती, कोठे आणि कशी गुंतवणूक केली पाहिजे यासाठी तज्ज्ञ, अनुभवी सल्लागारांची मदत घेतली,तर अपेक्षित परतावा मिळणे सहज शक्य होते.

भावना आणि अहंकार यावर ताबा

वर्ल्ड कप म्हटले, की तुम्हाला मैदानाचा, वातावरणाचा, परिस्थिती, सहकारी; तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंचा मान राखावा लागतो. विराटने स्वतः सांगितल्यानुसार, शेवटच्या मॅचमध्ये त्याने अहंकाराचा त्याग केला. गुंतवणुकीमध्येसुद्धा तुम्हाला तुमच्या भावना आणि हुशारीचा गर्व बाजूला ठेवून बाजाराला शरण जावे लागते, सन्मान द्यावा लागतो. योग्य तो अभ्यास करावाच लागतो किंवा तज्ज्ञ सल्लागाराची मदत घ्यावी लागते.

थोडक्यात काय, विश्‍वचषक जिंकण्यासाठी जशा वरील गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या, तशाच त्या गुंतवणुकीतसुद्धा जमल्या, तर विजय अर्थात भरघोस परतावा निश्चितच मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.