Rohit Sharma: 'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती? रोहित शर्माने केली मोठी गुंतवणूक

Education Fintech LEO1: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने edu-fintech स्टार्टअप LEO1 मध्ये गुंतवणूक केली आहे, ही त्याची फिनटेक कंपनीतील पहिली गुंतवणूक आहे.
Rohit Sharma LEO1
Rohit Sharma LEO1Sakal
Updated on

Education Fintech LEO1: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने edu-fintech स्टार्टअप LEO1 मध्ये गुंतवणूक केली आहे, ही त्याची फिनटेक कंपनीतील पहिली गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे LEO1 च्या वाढीला गती मिळेल आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचा मार्ग मोकळा होईल. LEO1 चे ध्येय शिक्षण सुलभ बनवणे आहे. ही कंपनी महाविद्यालये आणि शाळांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करते आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सेवा पुरवते.

LEO1 च्या मिशनला पाठिंबा देत, रोहित शर्मा म्हणाला की, “मी LEO1 च्या शिक्षणात क्रांती घडवून आणण्याच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यास पाठिंबा देत आहे. संपूर्ण पिढीसाठी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे उपक्रम राबवणे महत्त्वाचे आहे."

LEO1 चे संस्थापक आणि CEO रोहित गजभिये म्हणाले की, अनियमित कॅश फ्लो ही शैक्षणिक क्षेत्रातील मोठी समस्या आहे, जी LEO1 चे 'फायनान्शियल SAAS' मॉडेल सोडवते. हे मॉडेल विद्यार्थी आणि संस्थांमध्ये आर्थिक शिस्त आणण्यास प्रोत्साहन देते. ते पुढे म्हणाले, रोहित शर्मा आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि तो आमच्या कंपनी सोबत बराच काळ ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडला गेला आहे.

Rohit Sharma LEO1
Pakistan Stock Market: कंगाल पाकिस्तानमध्ये पैशांचा पाऊस; कराचीत शेअर बाजाराने केला ऐतिहासिक विक्रम

LEO1 ने अलीकडेच 'फायनान्शिअल SAAS' मॉडेल लाँच केले आहे, जे शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्स सेवा पुरवते. यामध्ये LEO1 कार्ड समाविष्ट आहे, जे कॅम्पसमध्ये स्मार्ट कार्ड आणि ओळखपत्र दोन्हीचे काम करते. या कार्डद्वारे विद्यार्थी सहज फी भरू शकतात, दुकानात खरेदी करू शकतात आणि एटीएममधून पैसे काढू शकतात.

याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक कर्ज. LEO1 आवश्यकतेनुसार तत्काळ शैक्षणिक कर्ज पुरवते, शैक्षणिक खर्चासाठी निधी पुरवला जातो. LEO1 विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी देखील काम करत आहे.

Rohit Sharma LEO1
HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; UPI व्यवहार केल्यास SMS येणार नाही, काय आहे कारण?

LEO1 ने देशभरातील तीस आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे, त्यांच्या 'फायनान्शिअल SAAS' प्लॅटफॉर्ममुळे सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. रोहित शर्माची गुंतवणूक कंपनीसाठी मोठी चालना देणारी आहे आणि त्याच्या पाठिंब्यामुळे LEO1 ला शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यास मदत होईल. असे मत कंपनीचे CEO रोहित गजभिये यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.