Indian GDP : ‘जीडीपी’ वाढीचा दर ६.८ टक्के ; भारत २०३१ पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न गटात

पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ६.८ टक्क्यांनी होईल आणि त्यापुढेही वाढीचा वेग लक्षणीय राहून भारत वर्ष २०३१ पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्नाचा दर्जा गाठेल, असा अंदाज ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.
Indian GDP
Indian GDPsakal
Updated on

नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ६.८ टक्क्यांनी होईल आणि त्यापुढेही वाढीचा वेग लक्षणीय राहून भारत वर्ष २०३१ पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्नाचा दर्जा गाठेल, असा अंदाज ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे. ‘क्रिसिल’ने आज ‘इंडिया आउटलुक’ अहवाल जाहीर केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, सध्या भारत ३.६ लाख कोटी डॉलरच्या ‘जीडीपी’सह सध्या अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. ती २०३१ पर्यंत दुप्पट होऊन सात लाख कोटी डॉलरची होईल. या वाढीला देशाच्या आर्थिक प्रगतीला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणा आणि चक्रीय घटकांचा आधार मिळेल. या आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा अधिक ७.६ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर, भारताची वास्तविक ‘जीडीपी’ वाढ २०२५ च्या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांपर्यंत मध्यम राहील. पुढील कालावधीत ६.७ टक्के दराने सरासरी वाढ होईल व वर्ष २०३१ पर्यंत दरडोई उत्पन्न उच्च-मध्यम उत्पन्न श्रेणीत म्हणजे ४५०० डॉलरपर्यंत वाढेल.

जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार, ज्या देशांचे दरडोई उत्पन्न एक ते चार हजार डॉलर आहे, ते देश कमी-मध्यम उत्पन्न असलेले देश आहेत, तर दरडोई चार ते १२ हजार डॉलर उत्पन्न असलेले देश हे उच्च-मध्यम उत्पन्न असलेले देश आहेत. ‘क्रिसिल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमिश मेहता म्हणाले, ‘‘देशातील उत्पादन क्षेत्र सध्या प्रगतीपथावर आहे.

Indian GDP
Share Market Top Shares: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

प्रमुख उद्योगक्षेत्रांमध्ये उच्च क्षमतेचा वापर, जागतिक पुरवठा-साखळीतील संधी, पायाभूत गुंतवणुकीवर भर, हरित-संक्रमण आणि बँकांचा मजबूत ताळेबंद यामुळे वाढीला चालना मिळाली आहे. सातत्यपूर्ण सुधारणा, जागतिक स्पर्धात्मकता आणि मूल्यसाखळी पुढे नेणे यामुळे भारताच्या ‘जीडीपी’मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा २०३१ च्या आर्थिक वर्षात अंदाजे २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढेल’’ भू-राजकीय स्थिती, जागतिक पातळीवरील अस्थिरता, हवामान बदल आणि तंत्रज्ञानातील अडथळे या आव्हानांमुळे संभाव्य वाढ कमी होईल, असेही या अहवालात म्हटले आहे.

देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी भारताला मुबलक संधी आहेत. आर्थिक वर्ष २०२५ ते २०३१ दरम्यान उत्पादन आणि सेवा क्षेत्राची वाढ अनुक्रमे ९.१ टक्के आणि ६.९ टक्के असण्याचा अंदाज आहे. उत्पादन क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी सेवा क्षेत्र भारताच्या वाढीला चालना देणारा प्रमुख घटक असेल.

- धर्मकीर्ती जोशी,

मुख्य अर्थशास्त्रज्ञ, क्रिसिल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()