Microsoft Outage: क्राऊडस्ट्राइक कंपनी मायक्रोसॉफ्ट सर्व्हर क्रॅशला जबाबदार? काय आहे कंपनीचे काम? जाणून घ्या सविस्तर

CrowdStrike: मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर जगभरात ठप्प झाले आहेत. त्यामुळे कार्यालय, विमानतळ, शेअर मार्केटसह अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. या समस्येसाठी क्राऊडस्ट्राइकला जबाबदार धरले जात आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा सेवा पुरवते.
CrowdStrike
Microsoft Windows CrashSakal
Updated on

Microsoft Server Down: मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर जगभरात ठप्प झाले आहेत. त्यामुळे कार्यालय, विमानतळ, शेअर मार्केटसह अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. या समस्येसाठी क्राऊडस्ट्राइकला जबाबदार धरले जात आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा सेवा पुरवते.

कंपनीने आपल्या उत्पादनात Falcon (CrowdStrike Falcon) दिलेल्या अपडेटमुळे ही समस्या उद्भवली आहे. CrowdStrike ने म्हटले आहे की त्यांनी हे अपडेट परत आणण्यास सुरुवात केली आहे.

CrowdStrikeच्या Falcon जबाबदार असल्याचे मानले जाते

CrowdStrike ही एक अमेरिकन सायबर सुरक्षा तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीची स्थापना 2011 मध्ये जॉर्ज कुर्ट्ज, दिमित्री अल्पेरोविच आणि ग्रेग मर्स्टन यांनी केली होती. या कंपनीला अनेक मोठ्या सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे.

कंपनीने 2013 मध्ये आपले फाल्कन उत्पादन लाँच केले. मायक्रोसॉफ्टला येणाऱ्या समस्येसाठी या उत्पादनात जबाबदार मानले जात आहे.

CrowdStrike
Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! बँकिंग-स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम; कोणत्या सेवा पडल्या ठप्प?

CrowdStrike समस्या सोडवण्यात व्यस्त

यापूर्वी मायक्रोसॉफ्टने दावा केला होता की त्यांची क्लाउड सेवा अधिक चांगली होत आहे. मात्र, या समस्येला CrowdStrike जबाबदार आहे याची सध्या तरी पुष्टी करता येत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील संगणकांवर निळी स्क्रीन दिसू लागली.

दुसरीकडे, CrowdStrike ने आपल्या संदेशात म्हटले आहे की ते समस्येचे निराकरण करण्यासाठी गांभीर्याने काम करत आहे. अनेक एअरलाइन्स, ब्रॉडकास्टर्स, स्टॉक एक्स्चेंज, दूरसंचार कंपन्या आणि बँकांना या समस्येचा चांगलाच फटका बसला आहे.

CrowdStrike
Adani Group: IPLमध्ये गौतम अदानींची एन्ट्री; अंबानींना देणार टक्कर, 'ही' टीम खरेदी करण्याच्या तयारीत

युजर्सनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या येत असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. कंपनीकडून ही समस्या सोडण्यासाठी अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही BIOS किंवा Windows च्या इतर हार्डवेअर सेटिंग्जमध्ये छेडछाड करू नये. CrowdStrike समस्येवर काम करत आहे. यासंबंधीचे अपडेट लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.