Petrol-Diesel Price Today: अलीकडच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत 52 रुपयांनी वाढून 6,945 रुपये प्रति बॅरल झाली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा दर सध्या 83-86 डॉलर प्रति बॅरल दरम्यान आहे.
13 जुलै 2024 च्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत. महानगरे आणि देशातील काही निवडक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
कच्च्या तेलाच्या किमती शुक्रवारी वायदा बाजारात 52 रुपयांनी वाढून 6,945 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवल्याने आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
परंतु भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे पुरवठा साखळी खंडित होण्याची भीती आहे.
15 मार्च रोजी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती. त्याअंतर्गत दोन्हीच्या किमती प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही कपात केली होती. आता निवडणुका संपल्या असून पेट्रोल आणि डिझेलचे दर किती दिवस कमी राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. मात्र, 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.