ATM Charges: ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; शुल्क वाढवण्याची ऑपरेटर्सची मागणी

Bank ATM Fees: एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांना येत्या काळात मोठा धक्का बसू शकतो कारण एटीएममधून पैसे काढणे महाग होऊ शकते. याचे कारण एटीएम चालकांकडून शुल्क वाढवण्याची मागणी केली जात आहे.
Bank ATM Fees
Bank ATM FeesSakal
Updated on

Bank ATM Fees: एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांना येत्या काळात मोठा धक्का बसू शकतो कारण एटीएममधून पैसे काढणे महाग होऊ शकते. याचे कारण एटीएम चालकांकडून शुल्क वाढवण्याची मागणी केली जात आहे.

अहवालानुसार एटीएम ऑपरेटर्सनी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI शी संपर्क साधला आहे. इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाते. समजा एटीएम कार्ड एसबीआयचे आहे आणि एटीएम मशीन पीएनबीचे आहे.

Bank ATM Fees
FM Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; नवीन अर्थसंकल्प 'या' दिवशी सादर करणार

अशा परिस्थितीत, व्यवहारासाठी एसबीआयकडून पीएनबीला इंटरचेंज फी भरली जाईल. बँका शेवटी या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकतात. हे शुल्क वाढल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआय)च्या मते हे शुल्क (इंटरचेंज फी) प्रति व्यवहार कमाल 23 रुपये वाढवले ​​पाहिजे. इतर अनेक ऑपरेटर्सनीही प्रति व्यवहार 23 रुपये वाढवण्याची मागणी केली आहे.

Bank ATM Fees
Gold Rate: सत्तेवर येताच मोदी सरकारचा मोठा निर्णय; सोन्याचे भाव आणखी वाढणार? अधिसूचना केली जारी

इंटरचेंज फी 2021 मध्ये शेवटची वाढवली होती. त्यावेळी इंटरचेंज शुल्क प्रति व्यवहार 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले होते. त्यानंतर शुल्क फक्त 17 रुपये आहे. यापूर्वीचा बदल दीर्घ कालावधीनंतर करण्यात आला होता, मात्र यावेळी विलंब होणार नसल्याचे ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. आता लवकरच बदल शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.