Cyber Security : मिस्ड कॉल आले आणि पैसे निघुनी गेले...

अशा प्रकारच्या फसवणुकीला ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ म्हणतात. तुमच्या हातात तुमचा मोबाईल
Cyber Security
Cyber Securitysakal
Updated on

डॉ. अपूर्वा जोशी | अमित रेठरेकर

दररोज विविध माध्यमातून अनोळख्या मेसेज, लिंक क्लिक करू नका असे ऐकले, वाचले असेल. समजा, असा आलेला अनोळखी मेसेज तुम्ही वाचला नाही, लिंक न बघता अगदी डिलीटदेखील केलीत. मात्र, सलग दोन-तीन मिस्ड कॉल आले आणि बँक खात्यावरील पैसे गायब झाले तर?

उत्तर दिल्लीतील एका महिला वकीलाला नुकताच याचा प्रत्यय आला. लागोपाठ तीन मिस्ड कॉल आले आणि काही मिनिटांमध्ये रक्कम वजा झाल्याचे मेसेजदेखील आले. ना त्या कोणाशी फोनवर बोलल्या; ना त्यांनी कोणाला ओटीपी दिला. असे काहीच नाही घडले नाही, तरीही मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक मात्र झाली. कॉल मिस झाला, तरीही फसवणूक झालीच.

ऑनलाइन फसवणुकीचा जुना फंडा

अशा प्रकारच्या फसवणुकीला ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ म्हणतात. तुमच्या हातात तुमचा मोबाईल असला, तरी त्याच नंबरचे सिम कार्ड कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळविले जाते आणि योग्य संधी साधून आर्थिक गंडा घातला जातो. या प्रकारात तुम्ही आधीच फिशिंग, विशिंग, स्मिशिंगद्वारे (विश्वासू पक्ष असे भासवून तुमची गोपनीय माहिती मिळवलेली असते) जाळ्यात अडकलेले असता. मोबाईल हरवले, गहाळ झाले अशी कारणे शोधून मोबाईल कंपनीकडून त्याच नंबरचे नवे सिम कार्ड घेतले जाते. नंतर योग्य वेळ पाहून असे व्यवहार पार पाडले जातात. (जसे दिल्लीतील या वकील कोर्टात असताना सहसा फोन सायलेंटवर ठेवतात, ही महत्त्वपूर्ण माहिती मिळविलेली होती.)

Cyber Security
Online Fraud : यू ट्यूबला लाइक करण्यासाठी पैशांचे आमिष; ५० लाखांना गंडा

डिजिटल इकोसिस्टीमची स्वच्छता

ही सर्व सिम कार्ड आधारित फसवणुकीची कार्यपद्धत समजून घेऊन भारत सरकारच्या विविध मंत्रालयांनी एकत्र येऊन ‘डिजिटल इकोसिस्टीम’ स्वच्छ करायचे ठरवले. यासाठी विविध यंत्रणा पडद्यामागे राहून कित्येक महिने तपास मोहिम राबवित होत्या. शेवटी दूरसंचार मंत्रालयाने ‘सिम’ विकणाऱ्या लोकांची देशव्यापी तपासणी करत, त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या आधारे ५२ लाख ‘सिम-कनेक्शन’ बंद केले; तसेच देशातील ६७ हजार सिम कार्ड विक्रेत्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले.

Cyber Security
Cyber Crimes : तरुणांसाठी धोक्याची घंटा! Internet च्या अतिवापरामुळे सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ'

सुरक्षेसाठी नवी प्रक्रिया कार्यान्वित

ग्राहकांना नवे सिम कार्ड मिळविताना केवायसी प्रक्रिया करावी लागेल. (आपल्या चालू/जुन्या नंबरचे नवे सिम घेतानादेखील).

सिम विक्रेत्यांना उत्तरदायित्व राहावे म्हणून त्यांची पोलिस खात्यामार्फत पडताळणी आणि सिम देताना बायोमेट्रिकद्वारे खात्री करणे अनिवार्य केले गेले.

Cyber Security
Mumbai Cyber Crime : मुंबईचे डिजिटल अंडरवर्ल्ड: सायबर फसवणूक प्रकरणात 12% गुन्ह्यांची उकल

संचार साथी’ पोर्टल तयार करण्यात आले असून, (https://sancharsaathi.gov.in) येथे ग्राहकांना आपल्या नावाने किती सिम कार्ड कनेक्शन आहेत, सगळे आपलेच आहेत का? हे तपासता येते आणि फोन हरवल्यास नंबर ब्लॉक करण्याची सुविधादेखील मिळते.

एवढ्या उपाययोजना करूनदेखील अशी फसवणूक होते, याचा अर्थ फसवणूक करणाऱ्याने ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तुम्हाला हेरलेले आहे, फक्त डाव कधी टाकतील, सांगता येत नाही. या डिजिटल युगात कोणीही कामाव्यतिरिक फोन नंबर मागत असेल, तर सावधान ! पुढे धोका आहे!

(लेखिका सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल आहेत आणि लेखक सर्टिफाइड

अँटी मनी लाँडरिंग एक्स्पर्ट आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()