DSK Case: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर डी एस कुलकर्णींच्या मालमत्ता विकत घेण्याचे प्रयत्न अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सुरु केले आहेत.
मात्र त्यातुन मिळणाऱ्या पैशातून सामान्य गुंतवणूकदारांची देणी भागवण्या ऐवजी कवडीमोल दराने डी एस केंच्या मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून केला जात आहे.
यातच आता मुंबईतील अंशदान प्रॉपर्टी लिमिटेड या कंपनीने डीएसकेडीएल कंपनीचा ताबा घेतला आहे. करारानुसार डीएसकेडीएल कंपनीचे शेअर्स शून्य होणार आहेत. 21 सप्टेंबर रोजी 2.50 कोटी शेअर्सची किंमत शून्य होणार आहे आणि कंपनीचं अस्तित्व देखील संपणार आहे. यामुळे शेअरधारकांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्यावर 28 ऑक्टोबर 2018 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एम.पी.आय.डी. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक प्रकरणी या गुन्ह्यात डीएसके, त्यांच्या कुटुंबीयांना मार्च 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.
असा केला घोटाळा
डीएसके यांनी तेजीच्या काळात आपल्या कंपनीद्वारे मुदत ठेवीही सुरू केल्या होत्या. गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत त्यांच्याकडे जवळजवळ 1हजार 115 कोटी रुपये गुंतवले.
हे पैसेही गुंतवणूकदारांना परत मिळालेले नाहीत. गृहनिर्माण प्रकल्प उभारणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तर तिथेही गुंतवणूकदार अडकले आहेत. लोकांना घरांचा ताबा मिळालेला नाही.
सगळ्याच बाजूने गुंतवणूकदारांचे हाल झाल्यावर त्यांनी एकत्र येऊन चौकशी सुरू केली. तेव्हा हा घोटाळा बाहेर आला होता. यासंबंधीचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.