Cotton Export: तब्बल 18 वर्षानंतर पांढऱ्या सोन्याच्या निर्यातीत घसरण, काय आहे कारण?

Cotton Export: सप्टेंबर 2022-23 मध्ये कापूस निर्यात 64 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे
Cotton Export
Cotton ExportSakal
Updated on

Cotton Export: भारतात यंदा कापसाचे पीक चांगले आले आहे. सर्व आव्हाने असतानाही कापसाचे चांगले उत्पादन झाले असले तरी देशांतर्गत बाजारपेठेत मालाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सप्टेंबर 2022-23 मध्ये कापूस निर्यात 64 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने सोमवारी सांगितले.

कापूस निर्यात 2021-22 वर्षात 43 लाख गाठी होती जी 2022-23 मध्ये 15.50 लाख गाठींवर (प्रत्येकी 170 किलो) आली, CAI डेटानुसार 2022-23 मध्ये निर्यातीत 15.50 लाख गाठींची घसरण झाली.

2022-23 मध्ये कापसाची आयातही 2.50 लाख गाठींनी कमी होऊन 12.50 लाख गाठींवर येण्याची अपेक्षा आहे, असे CAI चे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले.

कापूस उत्पादन समितीने (सीसीपीसी) सुरुवातीला 30 लाख गाठी कापसाची निर्यात करण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु जागतिक अर्थव्यवस्थेवर, विशेषतः चीनवर परिणाम झाल्यामुळे निर्यातीला फटका बसला.

कापूस बाजारातील घसरण हे त्याचे कारण आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कापूस निर्यातीला विलंब होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही कापसाचे भाव वाढतील, त्यानंतर ते आपला माल घेऊन बाजारात येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

Cotton Export
Anil Ambani: अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, किती कोटींना होणार विक्री?

अहवालानुसार, गेल्या हंगामातही बाजारभावात घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस पीक बाजारात आणण्यास उशीर केला. अशाप्रकारे योग्य वेळी कापूस विकून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला, मात्र तज्ज्ञांच्या मते, नव्या पिकाला एवढा चांगला भाव मिळणे शेतकऱ्यांना अवघड आहे, कारण यंदा उत्पादनात वाढ झाली आहे, त्यामुळेच जागतिक बाजारपेठेतही कापसाच्या दरात घसरण झाली आहे.

Cotton Export
Gold Silver Price: इस्राइल पॅलेस्टाईन युद्धाचा ताप! सोने पुन्हा झाले महाग, काय आहे आजचा भाव?

तज्ञ काय म्हणतात

कापूस व्यवसायातील मंदीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता शेतकऱ्यांनी कापूस वेचल्यानंतर साठवणुकीची योग्य व्यवस्था केली असून, त्यामुळे योग्य वेळी कापूस विकून चांगले पैसे मिळू शकतात.

त्याचबरोबर जास्त उत्पादन होऊनही बाजारपेठेत कापसाच्या पुरवठ्यात एक तृतीयांश घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. भारताने चालू हंगामात 1 ऑक्टोबरपासून 2022-23 मध्ये 34.4 दशलक्ष गाठींचे उत्पादन केले आहे, जे पूर्वीपेक्षा 12 टक्के जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.