Amul Trademark: डेअरी ब्रँड अमूलला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रेडमार्क उल्लंघनाच्या एका मोठ्या प्रकरणात न्यायालयाने अमूलला दिलासा दिला आहे. भारतातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड अमूल आणि इटालियन कंपनी Terre Primitive यांचे ट्रेडमार्क प्रकरण कोर्टात गेले होते. इटालियन फर्म 'अमुलेटी' या ट्रेडमार्कखाली कुकीज आणि चॉकलेट बिस्किटे विकत होती. अमुलेटीचे ट्रेडमार्क अमूलच्या प्रसिद्ध ट्रेडमार्क सारखेच होते.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) आपल्या दुग्धजन्य पदार्थांची अमूल या ब्रँड नावाने विक्री करते. कंपनीने आपले वकील अभिषेक सिंग यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात ट्रेडमार्कचा दावा दाखल केला.