‘Boroline’ vs ‘Borobeauty’ Delhi HC: देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून प्रत्येक घराघरात वापरल्या जाणाऱ्या 'बोरोलिन' क्रीमचे प्रकरण न्यायालयात पोहोचले, तेव्हा न्यायमूर्तींनी हा 'सुप्रसिद्ध ट्रेडमार्क' असल्याचे विरोधकांना सांगितले. 1929 मध्ये जेव्हा ही क्रीम देशात लाँच झाली, तेव्हा देश ब्रिटिशांच्या हातात होता.
आज दिल्ली उच्च न्यायालयाने 'बोरोलिनला ट्रेडमार्क कायद्यांतर्गत 'सुप्रसिद्ध ट्रेडमार्क' म्हणून घोषित केले आहे. तसेच, इतर कंपनीला त्यांचा 'ट्रेड ड्रेस' बदलण्यचे आदेश देण्यात आले आहेत.