Layoffs News: कर्मचारी कपातीच संकट अधिक गडद, आता 'ही' कंपनी देणार 1,200 कर्मचाऱ्यांना नारळ

जागतिक मंदीचा जगभरातील विविध क्षेत्रांवर परिणाम होत आहे.
Layoffs
LayoffsSakal
Updated on

Layoffs News: जागतिक मंदीचा जगभरातील विविध क्षेत्रांवर परिणाम होत आहे. गेल्या काही काळात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये Twitter, Microsoft, Meta, Google इत्यादी अनेक कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

आता ऑडिट फर्म कंपनी Deloitte चे नाव देखील कर्मचारी कपातीच्या कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. फायनान्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांच्या 1.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखली आहे.

अशा परिस्थितीत कंपनी एकूण 1,200 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. ही सर्व कर्मचारी कपात अमेरिकेत केली जाणार आहे.

या विभागांमध्ये कंपनी कर्मचारी कपात करणार आहे :

कंपनी विविध विभागांमध्ये नोकऱ्या कमी करणार आहे. यामध्ये आर्थिक सल्लागार व्यवसायात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल.

कंपनीने यूएसमधील सर्व 1,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारतात काम करणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही.

Layoffs
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीवर ₹ 5,000 पर्यंत सूट; जाणून घ्या कुठे आहे ऑफर

अर्न्स्ट अँड यंग यांनीही काम बंद केले :

अर्न्स्ट आणि यंगने अलीकडेच आपल्या 3,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एकूण संख्याबळाच्या हे प्रमाण 5 टक्के आहे.

याशिवाय फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आहे. फेसबुक तसेच व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राममध्ये कर्मचारी कपात होणार आहे.

जगात मंदीच्या भीतीने, मोठ्या संख्येने कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत.

अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :

गेल्या काही महिन्यांतील मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेल कंपनीने 6,650 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

त्याच वेळी, दिग्गज कंपनी Google ने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, मायक्रोसॉफ्ट यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

Layoffs
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.