Jobs in India: कामगारांच्या पगारात घट तर बेरोजगारांच्या संख्येत वाढ, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Frontline Jobs Declined in India: देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.
Unemployment in India
Unemployment in IndiaSakal
Updated on

Frontline Jobs Declined in India: फ्रंटलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बेटरप्लेसच्या आकडेवारीनुसार, भारतातील कंपन्यांनी मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सुमारे 6.6 दशलक्ष फ्रंटलाइन नोकऱ्या निर्माण केल्या.

फ्रंटलाइन नोकऱ्यांची एकूण मागणी 2023 मध्ये 17.5 टक्क्यांनी कमी होऊन ती 6.6 दशलक्ष झाली आहे, जी वर्षभरापूर्वी 8.8 दशलक्ष होती. अशी माहिती 'बेटरप्लेस'ने दिली आहे. यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.

लॉजिस्टिक आणि मोबिलिटी क्षेत्राने सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणून ई-कॉमर्सची जागा घेतली आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत हा डेटा तयार करण्यात आला आहे.

2022 आणि 2023 दरम्यान IFM & IT हे क्षेत्र नोकऱ्यांच्या मागणीच्या बाबतीत सर्वात वेगाने वाढणारा उद्योग होता, जो 139 टक्क्यांनी वाढला आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये कामगारांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली.

Unemployment in India
Manmohan Singh Birthday: एक निर्णय अन् 30 वर्षात कोट्यवधी लोक आले गरिबीतून बाहेर, असं होतं मनमोहन सिंग यांचं अर्थकारण

महिलांचा कर्मचाऱ्यांमधील सहभाग दुपटीने वाढला आहे. महिलांच्या सहभागाचे प्रमाण FY22 आणि FY23 दरम्यान 3 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सर्वेक्षणांनुसार, 88% महिलांना त्यांच्या कुटुंबियांनी काम करण्यासाठी पूर्ण किंवा काही प्रमाणात पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे त्यांचा सहभाग वाढला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि तामिळनाडू राज्यात भारतातील कामगारांचा सर्वाधिक पुरवठा आणि मागणी आहे.

एकूण फ्रंटलाइन कामगारांपैकी सुमारे 67 टक्के कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. FY23 मध्ये कामगारांची सर्वाधिक संख्या कर्नाटकमध्ये आहे.

Unemployment in India
Delhi HC: कर्जदारांना मोठा दिलासा! बँकांच्या कर्ज वसुलीबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

अहवालानुसार कामगारांच्या सरासरी मासिक पगारात किरकोळ घट झाली आहे - FY22 मध्ये रुपये 22,800 वरून FY23 मध्ये रुपये 21,700 पर्यंत घट झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.