डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधी

ऑप्शन ग्रीक समजून घेणे हे डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या निकषांपैकी एक आहे.
डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधी
डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधीsakal
Updated on

ऑप्शन स्ट्रॅटेजीज अंमलात आणताना, हॅप हॅझर्ड ट्रेड्स घेतल्यास गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी होते. ऑप्शन ट्रेड्स शास्त्रोक्त पद्धतीने घेतले गेल्यास नफ्याची शक्यता वाढते. त्याकरिता खालील बाबींची सखोल माहिती आवश्‍यक आहे.

टेक्निकल अॅनालिसिसचे ज्ञान

भविष्यातील किमतीचा अंदाज लावण्याचे ज्ञान

डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीची माहिती

डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधी
Mumbai : आरक्षित तिकीटांवर कोण डल्ला मारते आढावा घ्या; राजू पाटील

डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी काय आहे?

ऑप्शन ग्रीक समजून घेणे हे डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या निकषांपैकी एक आहे. या ग्रीक्सना समजून घेतल्याने ऑप्शन प्रीमियम सर्व घटकांवर कसा प्रतिक्रिया देणार आहे, याबद्दल अधिक चांगली माहिती मिळते. डेल्टा, थीटा, गामा, वेगा, रो या ग्रीक्स ऑप्शनच्या किमतीच्या इंट्रेनसिक व्हॅल्यूवर अवलंबून असते. ऑप्शन पोर्टफोलिओच्या विश्लेषणासाठी ग्रीक्सचा वापर केला जातो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी हे निकष आवश्यक आहेत.

डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधी
Mumbai : चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचे स्पष्ट; 'त्या' प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल!

स्ट्राइक प्राईसची निवड

अचूक परिणामांसाठी ऑप्शन स्ट्रॅटेजी तयार करण्याकरिता स्ट्राइक प्राईसची निवडदेखील महत्त्वपूर्ण आहे. स्ट्राइक प्राईसची निवड प्राईस टार्गेटवर आणि टाइम टार्गेटवर अवलंबून असते.

तसेच शेअरचा भाव वर जातांना मोठा अडथळा शोधण्यासाठी ‘ओआय डेटा’ विश्लेषण महत्त्वाचे आहे, त्यात ऑप्शन चेन डेटा विश्लेषणासाठी उपयुक्त माहिती देतो. तसेच ‘पे-ऑफ’ आकृती समजून घेतल्याने भांडवल आणि जोखीम यानुसार रणनीती राबवण्यास मदत होते. जास्तीत जास्त जोखीम, जास्तीत जास्त नफा, नफ्याची संभाव्यता,

आवश्यक भांडवल आणि सर्व ग्रीकचे विश्लेषण याचा अभ्यास करण्यासाठी कालावधी आणि अचूक किंमतीसह ‘पे-ऑफ’ आकृती उपयुक्त ठरते. अर्थात, केवळ रणनीती जाणून घेणे पुरेसे नाही. टाइम टार्गेट आणि प्राईस टार्गेटनुसार कोणती रणनीती वापरायची हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. परिस्थितीतील बदलानुसार, रणनीतीतदेखील बदल करणेही महत्त्वाचे आहे. यामुळे गुंतवणूक फायदेशीर होऊ शकते.

डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी : फायद्याची संधी
Sakal Impact : पाण्याच्या अवैध उपशाविरोधात ‘महावितरण’ची धडक कारवाई

वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. माझे, ऋत्विक जाधव आणि किरण असोसिएट्स यांचे कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि या शेअरमध्ये माझी गुंतवणूक नाही. तथापि, आमच्या क्लायंट्सची काही पोझिशन असू शकते.

(लेखक किरण जाधव अँड असोसिएट्स येथे काम करत असून तांत्रिक विश्लेषक आहेत.)

डिस्क्लेमर आणि डिस्क्लोजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.