नवी दिल्ली : एप्रिलमध्ये देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक ३.८८ टक्क्यांनी वाढून १.३२ कोटी झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ही आकडेवारी जारी केली आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही संख्या १.२८ कोटी होती. एप्रिलमध्ये एकूण ३२,३१४ फ्लाइट रद्द झाल्या आणि विमान वाहतूक कंपन्यांनी नुकसानभरपाई आणि सुविधांसाठी ८९.२६ लाख रुपये खर्च केले. बोर्डिंग नाकारल्यामुळे तब्बल १३७० प्रवासी प्रभावित झाले.
या संदर्भात नुकसानभरपाई आणि सुविधांसाठी विमान कंपन्यांनी १३६ लाख रुपये खर्च केले आहेत, तर गेल्या महिन्यात एकूण एक लाख ९ हजार ९१० उड्डाणांना उशीर झाला, त्याबद्दल विमान कंपन्यांनी सुविधेसाठी १३५ लाख रुपये खर्च केले, अशी माहितीही ‘डीजीसीए’ने दिली आहे.
वेळेवर उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये एआयक्स कनेक्टने आघाडी घेतली असून, तिने वेळेवर उड्डाण करण्यात ७९.५ टक्के प्रमाण नोंदवले आहे. त्यानंतर विस्तारा (७६.२ टक्के), इंडिगो (७६.१ टक्के), एअर इंडिया (७२.१ टक्के) अशी क्रमवारी आहे.
विमान वाहतूक बाजारपेठेत इंडिगोचा बाजार हिस्सा गेल्या महिन्यात ६०.६ टक्क्यांपर्यंत वाढला होता, तर एअर इंडियाचा हिस्सा १४.२ टक्क्यांपर्यंत वाढला होता. विस्तारा आणि एआयएक्स कनेक्टचा बाजार हिस्सा अनुक्रमे ९.२ टक्के आणि ५.४ टक्क्यांवर घसरला. एअर इंडिया, विस्तारा आणि एआयएक्स कनेक्ट हे टाटा समूहाचे भाग आहेत.
अकासा एअरचा बाजारहिस्सा एप्रिलमध्ये ४.४ टक्क्यांवर स्थिर राहिला, तर स्पाईसजेटचा हिस्सा ४.७ टक्क्यांवर घसरला. जानेवारी २०२४ मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रवासी नेले ५२.३ कोटी होते, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत ५०.३ कोटी होते, ज्यामुळे वार्षिक ३.८८ टक्के आणि मासिक २.४२ टक्के वाढ नोंदवली गेली, असेही ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.