DGCAचा Air India आणि Spicejet ला दणका! प्रत्येकी 30 लाखांचा ठोठावला दंड

दाट धुक्याच्या स्थितीत उड्डाणांबाबत केलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
DGCAचा Air India आणि Spicejet ला दणका! प्रत्येकी 30 लाखांचा ठोठावला दंड
Updated on

नवी दिल्ली : दाट धुक्याच्या स्थितीत विमानांच्या उड्डाणांबाबत केलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी DGCAनं एअर इंडिया आणि स्पाईसजेटला चांगलाच दणका दिला आहे. या दोन्ही विमान कंपन्यांवर प्रत्येकी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिगो विमानाचं उड्डाण तब्बल १२ तास विलंब झाला होता. यापार्श्वभूमीवर DGCA नं हे पाऊल उचललं आहे. (Marathi Tajya Batmya)

DGCAनं नेमकी काय कारवाई केलीए?

DGCA नं 6 नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या मुख्यालयात कमी दृश्यमानता ऑपरेशन्स आणि धुक्याची तयारी यावर एअरलाइन ऑपरेटर्सना वैमानिकांच्या रोस्टरिंगबाबत सूचना दिल्या होत्या. पण या सूचनांचं पालन न केल्यानं एअर इंडिया आणि स्पाइसजेटला प्रत्येकी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Marathi Tajya Batmya)

यापूर्वी, DGCA नं दिल्ली विमानतळावर कमी-दृश्यतेदरम्यान नॉन-CAT III पालन न करणाऱ्या वैमानिकांना रोस्टर केल्याबद्दल एअरलाइन्सना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. ज्यामुळं दिल्लीकडं जाणारी अनेक उड्डाणं इतर विमानतळांवर वळवावी लागली होती.

DGCAचा Air India आणि Spicejet ला दणका! प्रत्येकी 30 लाखांचा ठोठावला दंड
Delayed Flights:...तर एअरलाईन्सला रद्द करावी लागणार फ्लाईट; DGCA कडून मोठा बदल

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये इंडिगोचं विमान मुंबई विमानतळावर उभं होतं तसेच या विमानातील प्रवाशी विमानातून खाली उतरुन त्यांनी रनवेवरच ठिय्या मांडला होता. या ठिकाणी ते आपल्याजवळी डबा खात असल्याचं यामध्ये दिसत होतं. (Latest Marathi News)

या व्हिडिओबाबत इंडिगोनं नंतर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, फ्लाईट 6E2195 गोवा ते दिल्ली जाणार होतं. दिल्लीतील धुक्यांमुळं फ्लाईट मुंबईकडं वळवण्यात आली. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची माफी मागतो. या प्रकरणात आम्ही लक्ष घालत आहोत, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं होतं.

DGCAचा Air India आणि Spicejet ला दणका! प्रत्येकी 30 लाखांचा ठोठावला दंड
DGCA: अमेरिकेत विमानाचा हवेतच उघडला दरवाजा; भारतात DGCA अ‍ॅलर्टवर, काढले महत्वाचे आदेश

तसेच निश्चित वेळेत माहिती दिली गेली नसल्यानं इंडिगोवर कडक कारवाई करण्यात येईल. यात आर्थिक दंडाचा देखील समावेश असेल, असा कठोर इशारा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर इंडिगोला नोटीसही बजावण्यात आली होती. मुंबई विमानतळाने प्रवाशांना रेस्टरुम आणि रिफ्रेशमेंट सुविधेचा लाभ विमान कंपनीनं दिला नाही. त्यांना रणवेवरच थांबावं लागलं. यावेळी सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालं असं मंत्रालयाने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.