MS Dhoni Investment: 'कॅप्टन कूल' धोनीने 'या' कंपनीत केली 200 कोटींची गुंतवणूक; ओला-उबेरला देणार टक्कर

EV Startup BluSmart: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने अनेक व्यवसायात गुंतवणूकही केली आहे. त्याने क्रीडा, हॉटेल, एरोस्पेस, शाळा, सेंद्रिय शेती आणि मनोरंजन यासह अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
BluSmart
MS Dhoni InvestmentSakal
Updated on

MS Dhoni Investment Startup: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने अनेक व्यवसायात गुंतवणूकही केली आहे. त्याने क्रीडा, हॉटेल, एरोस्पेस, शाळा, सेंद्रिय शेती आणि मनोरंजन यासह अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. धोनी क्रिकेटच्या खेळपट्टीपासून व्यावसायिक क्षेत्रापर्यंत यशस्वी खेळी करताना दिसतो. आता त्याने इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रात एन्ट्री केली आहे.

BlueSmart मध्ये केली गुंतवणूक

EV स्टार्टअप BlueSmart मध्ये MS धोनीने 200 कोटींची गुंतवणूक केली आहे. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी तो एक आहे. BlueSmart कंपनी 2019 मध्ये लाँच करण्यात आली.

हे ओला-उबेर सारखी कॅब सेवा देते. विशेष म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रातील धोनीची ही दुसरी गुंतवणूक आहे. यापूर्वी, त्याने सायकलशी संबंधित स्टार्टअप eMotorad मध्ये गुंतवणूक केली होती.

BluSmart
Budget 2024: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पात मिळू शकते ‘गुड न्यूज’; करात दिलासा मिळणार का?

कंपनीचा 550 कोटींचा वार्षिक महसूल

ब्लूस्मार्टची सेवा दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये उपलब्ध आहेत. जून 2024 मध्ये, कंपनीने दुबईमध्ये प्रीमियम ऑल-इलेक्ट्रिक लिमोझिन लॉन्च केली आहे. अनमोल सिंग जग्गी, पुनीत सिंग जग्गी आणि पुनीत के गोयल हे कंपनीचे संस्थापक आहेत. BlueSmart ने अलीकडेच वार्षिक महसूलचा 550 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

BluSmart
RBI: आरबीआयचा कर्जदारांना दिलासा! नियमात केला मोठा बदल; बँकांना पाठवल्या सूचना

धोनीच्या इतर महत्त्वाच्या गुंतवणुकींमध्ये हॉटेल माही रेसिडेन्सी आणि सेंद्रिय शेतीचाही समावेश आहे. धोनीकडे सध्या फक्त एकच हॉटेल आहे, ते रांचीमध्ये आहे. त्याने रांचीमध्येच 43 एकरांचे फार्महाऊस बनवले आहे, जिथे तो सेंद्रिय शेती करतात. याशिवाय महेंद्रसिंग धोनी कडकनाथ कोंबडीचाही व्यवसाय करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.