Diamond Prices: हिरे झाले स्वस्त! जगभरात हिऱ्यांच्या किंमतीत मोठी घसरण, काय आहे कारण?

Diamond Prices Fall: जगभरात हिऱ्यांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
Diamond Prices
Diamond PricesSakal
Updated on

Diamond Prices Fall: जगभरात हिऱ्यांच्या किंमतीत घसरण झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनानंतर अनेक ग्राहकांनी चैनीच्या वस्तू घेतल्या नाहीत. ज़िम्निस्की ग्लोबल रफ डायमंड इंडेक्सनुसार, हिऱ्यांच्या किंमती एका वर्षातील निचांकी पातळीवर आहेत.

जागतिक हिरे विश्लेषक पॉल जिम्निस्की म्हणतात की, ग्राहकांनी हिऱ्यांऐवजी इतर सेवा निवडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ही मोठी घसरण दिसून येत आहे.

इतकंच नाही तर विश्लेषकांचा असाही विश्वास आहे की कोविड महामारीनंतर लोक आता बाहेरचे पदार्थ खात आहेत, प्रवास करत आहेत आणि चैनीच्या वस्तूंऐवजी अनुभवांवर पैसे खर्च करत आहेत, जे जगभरातील हिऱ्यांच्या घसरणीचं एक प्रमुख कारण आहे.

Diamond Prices
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यामुळे फ्लिपकार्ट अडचणीत, काय आहे नेमकं प्रकरण?

सीएनएनचा अहवाल काय म्हणतो?

CNN च्या अहवालानुसार, 2021 आणि 2022 मध्ये नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी सर्वाधिक होती. एवढेच नाही तर येत्या काही महिन्यांत हिऱ्यांच्या किंमती किंचित वाढू शकतात, असा अंदाज जगातील सर्वात मोठी डायमंड कंपनी डी बियर्सचे प्रवक्ते डेव्हिड जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.

Diamond Prices
Nobel Prize 2023: कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले नोबेल, कोण आहेत कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन?

भारतातील हिऱ्यांचा व्यवसाय

सुरतमध्ये जगातील 90% हिरे कापून पॉलिश केले जातात. रशियातून दरवर्षी 75,000 कोटी रुपयांचे रफ हिरे आयात केले जातात. सुरतमध्ये 500 हून अधिक हिरे उत्पादन युनिट आहेत. भारतातील कट पॉलिश हिऱ्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे. यूएस व्यतिरिक्त यूएई आणि हाँगकाँगमध्ये मोठी मागणी आहे.

हिरे उत्पादक देश

रफ डायमंड उत्पादनात रशियाचा 33 टक्के हिस्सा आहे, तर बोत्सवानाचा 18 टक्के, कॅनडाचा 13 टक्के, काँगोचा 10 टक्के, ऑस्ट्रेलियाचा 10 टक्के आणि इतर देशांचा 16 टक्के हिस्सा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()