‘टीडीएस’ आणि ‘टीसीएस’

प्राप्‍तिकर विवरणपत्र भरताना अनेक लोकांचा ‘टीडीएस’ आणि ‘टीसीएस’ यात गोंधळ उडतो.
difference between tds and tcs tax deduction and tax collection
difference between tds and tcs tax deduction and tax collectionSakal
Updated on

- ॲड. प्रतिभा देवी

प्राप्‍तिकर विवरणपत्र भरताना अनेक लोकांचा ‘टीडीएस’ आणि ‘टीसीएस’ यात गोंधळ उडतो. अनेकांना ‘टीडीएस’ अर्थात टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स म्हणजेच उत्पनाच्या स्रोतावर कापलेला कर व ‘टीसीएस’ अर्थात टॅक्स कलेक्शन अ‍ॅट सोर्स म्हणजे कर गोळा करताना कापलेला कर यातील नेमका फरक माहित नसतो. तो जाणून घेणे आवश्‍यक आहे.

‘टीडीएस’ म्हणजे काय?

प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार, उत्पन्नाच्या स्रोतावर हा कर आकारला जातो. उदा. समजा, तुम्हाला १० लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरीत जिंकलेल्या संपूर्ण रकमेवर ३० टक्के ‘टीडीएस’ आकारला जातो.

त्यानुसार, १० लाख रुपयांवर ३० टक्के म्हणजे तीन लाख रुपये ‘टीडीएस’ वजा करून तुम्हाला सात लाख रुपये मिळतील. तुम्हाला वार्षिक ३० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम व्यावसायिक फी रुपाने मिळाल्यास, त्यावरही १० टक्के ‘टीडीएस’ कापला जातो. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तुम्ही याचा परतावा घेऊ शकता.

टीसीएस’ म्हणजे काय?

‘टीसीएस’ म्हणजे उत्पन्न स्रोतावर जमा केलेला कर. हा कर विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर लावला जातो. उदा. दारू, तेंदूपत्ता, लाकूड, भंगार, खनिजे आदी. मालाची किंमत घेतानाच त्यात हा करही समाविष्ट केलेला असतो.

खरेदीदाराकडून ‘टीसीएस’ घेऊन, तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते. हा कर वैयक्तिक उपभोगासाठीच्या वस्तूंच्या व्यवहारावर लागू होत नाही.

‘टीसीएस’ कोणाला घेता येतो?

एखाद्या व्यावसायिकाची एका आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असेल आणि विक्री किंमत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर विक्रेता खरेदीदारांकडून ‘टीसीएस’ घेऊ शकतो. ‘टीसीएस’चा दर वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा असतो. उदा. तेंदूपत्त्यासाठी हा दर कमाल पाच टक्के आहे, तर दारूसाठी एक टक्का आहे.

वस्तू सेवा कर कायद्याखाली ‘टीसीएस’

वस्तू सेवा कर कायद्यातील कलम ५२ अंतर्गत ई-कॉमर्स कंपन्या सेवा किंवा वस्तू विक्रेत्यांना ‘टीसीएस’ लागू करतात. उदा. एखादी व्यक्ती ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आदी ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कपडे विक्री करत असेल, तर ई-कॉमर्स कंपन्या त्याच्याकडून ‘टीसीएस’ घेतात.

अपवाद

१) हॉटेलमधील वास्तव्य २) प्रवासी वाहतूक करणारे ३) प्लंबर, सुतार आदी व वस्तू व सेवा कर कायद्याखाली नोंदणी नसणारे.

‘टीसीएस’चे संकलन आणि भरण्यासाठी विक्रेते जबाबदार असल्याने, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्याच्या व्यवहारांवरील ‘टीसीएस’ भरणे आवश्‍यक आहे. उदा. नोव्हेंबर २०२३ रोजी केलेल्या व्यवहारासाठी,

सात डिसेंबरपर्यंत ‘टीसीएस’ सरकारकडे जमा करणे अपेक्षित आहे, तर ‘टीसीएस’ विवरणपत्र प्रत्येक तिमाहीनंतरच्या पुढील महिन्यातील १५ तारखेपर्यंत भरावे. उदा. एप्रिल ते जून तिमाहीसाठीचे ‘टीसीएस’ विवरणपत्र १५ जुलैपर्यंत भरणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.