भारतीय क्रिकेटमध्ये Reliance चे राज्य! डिज्नी स्टार अन् Viacom 18 ची डील पक्की, CCI चा ग्रीन सिग्नल

Disney Star and Viacom18 Merger: डिज्नी स्टार अन् वायकॉम १८ या कंपन्यांचे विलगीकरण होणार असून याचा फायदा भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Disney Star-Viacom18 Joint Venture
Disney Star-Viacom18 Joint VentureSakal
Updated on

Disney Star-Viacom18 Joint Venture: भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांवर क्रिकेट सामने पाहायला मिळत आहेत. म्हणजे कधी हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स, कधी जिओ सिनेमावर, स्पोर्ट्स १८ वर. पण आता एकाच ठिकाणी सामने पाहाता येऊ शकतात.

यामागील कारण असे की कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) रिलायन्स इंडस्ट्रीज लि. समूहाचा भाग असलेल्या ‘वायकॉम १८’चा मनोरंजन व्यवसाय आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या स्टार इंडिया प्रा. लि. यांच्या विलगीकरणाला परवानगी दिली आहे.

या विलगीकरणामुळे भारतीय मीडिया क्षेत्रात मोठा परिणाम होताना दिसणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील दोन मोठे पॉवर हाऊस एकत्र येत असल्याने देशातील एक मोठा मीडिया समूह तयार होईल.

खरंतर फेब्रुवारी २०२४ मध्येच यांचं विलगीकरण होणार असल्याची चर्चा होती. कारण रिलायन्स इंडस्ट्री, वायाकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिज्नी या कंपन्यांचे करार निश्चित झाले होते.

Disney Star-Viacom18 Joint Venture
Proposal for Merger : ‘रिलायन्स’ला ‘सीसीआय’ मंजुरीची अपेक्षा;वायकॉम १८ आणि स्टार इंडिया विलीनीकरणासाठी प्रस्ताव सादर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.