गुंतवणुकीमध्ये विविधता असावी, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे एका विशिष्ट मालमत्ता विभागातसुद्धा विविधता असणे गरजेचे आहे. उदा. शेअर. विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी याच संकल्पनेवर आधारित इंडेक्स फंड योजना आणल्या आहेत. शेअर बाजारामध्ये वेगवेगळी उद्योगक्षेत्रे, विविध संकल्पना यावर आधारित अनेक निर्देशांक (इंडेक्स) असतात.