Diwali Bank Holiday 2023: दिवाळी निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. दरम्यान, आज तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज पासून बँका सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. म्हणजे बँक शाखांमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही काम होणार नाही.
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांवर अवलंबून असते. नोव्हेंबर-2023 च्या सुट्ट्यांची यादी पाहिली तर 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यासाठी आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्टीच्या यादीनुसार, महिन्यात एकूण 15 बँकिंग सुट्ट्या होत्या, त्यापैकी अनेक सुट्ट्या आधीच झाल्या आहेत. या सुट्यांमध्ये दुसरा शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
बँकांमध्ये जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी आरबीआयच्या वेबसाइटला भेट देऊन पाहिली जाऊ शकते किंवा तुम्ही या लिंकवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) क्लिक करून तपासू शकता.
दिवाळीत बँकांना सुट्टी
11 नोव्हेंबर (शनिवार) - दुसऱ्या शनिवारी बँकांची नियमित सुट्टी
12 नोव्हेंबर (रविवार) - रविवारमुळे बँका बंद
13 नोव्हेंबर (सोमवार) - गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा (दीपावली)/दिवाळी: त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद आहेत.
14 नोव्हेंबर (मंगळवार) - दिवाळी (बळी प्रतिपदा)/दीपावली/विक्रम संवंत नवीन वर्षाचा दिवस/लक्ष्मी पूजा – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम.
15 नोव्हेंबर (बुधवार) - भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / सेंग कुत्स्नेम - सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद आहेत.
बँक बंद असताना काय करावे?
बँक बंद असल्यास ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही सुट्टीच्या दिवशी बँकेच्या शाखेत जाऊ शकणार नाही पण तुम्ही बहुतांश काम ऑनलाइन करू शकता. तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI इत्यादी वापरू शकता. याशिवाय रोख व्यवहार करण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.