Donald Trump Threat: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतातील काही अमेरिकन उत्पादनांवर विशेषत: हार्ले-डेव्हिडसन बाइक्सवरील कराचा मुद्दा उपस्थित केला. यासोबतच सत्तेत परतल्यावर हाच कर देशावर लादण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी भारताला 'टॅक्स किंग' म्हटले होते. मे 2019 मध्ये, यूएस मार्केटमध्ये भारताला प्राधान्य देणारी जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द करण्यात आली.
भारतातील कराचे दर खूप जास्त असल्याचे म्हटले
फॉक्स बिझनेस न्यूजच्या लॅरी कुडलो यांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारताचे कर दर अत्यंत जास्त असल्याने यावर प्रश्न उपस्थित केला. ट्रम्प म्हणाले, ''मला एक समान कर हवा आहे, भारतात जास्त कर लावला जातो, मी हे हार्ले-डेव्हिडसन (बाईक) सोबत पाहिले.
मी म्हणालो की तुम्ही भारतासारख्या ठिकाणी कसे काम करता? ते 100 टक्के, 150 टक्के आणि 200 टक्के कर लावतात.''
ते पुढे म्हणाले की, "आमच्याकडे काही लोक होते, जसे की पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर, जे मला आवडतात. मी त्यांना म्हणालो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो.
जर भारत आमच्याकडून 200 टक्के शुल्क आकारत असेल आणि आम्ही त्यांच्याकडील उत्पादनांसाठी काहीही कर आकारत नाही, तर आम्ही त्यांना 100 टक्के शुल्क आकारू शकतो का? तर ते म्हणाले, नाही सर, हा मुक्त व्यापार नाही.
मग मी म्हणालो, आपण त्यांना 50 टक्के शुल्क आकारू शकतो का? तर ते म्हणाले, नाही, मग मी म्हणालो, 25 टक्के, 10 टक्के, किंवा काहीही? तर ते म्हणाले, नाही, मग मी म्हणालो, त्यात काय चूक आहे?
ब्राझीलच्या करप्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले.
ट्रम्प म्हणाले, 'जर भारत आमच्यावर कर लावत असेल तर आम्ही त्यांच्यावरही कर लावला पाहिजे.' त्यांनी भारत आणि ब्राझीलच्या करप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले.
ट्रम्प यांनी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी बुधवारी होणाऱ्या पहिल्या प्राथमिक चर्चेत सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.