Loksabha Election 2024: 'माझ्याकडे निवडणूक लढवायलाही पैसे नाहीत', निर्मला सीतारामन असं का म्हणाल्या?

Loksabha Election 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 27 मार्च रोजी सांगितले की, मी लोकसभा निवडणूक लढवत नाही कारण त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी निधी नाही. सीतारामन म्हणाल्या की, भाजपने त्यांना तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता
Why is Nirmala Sitharaman not contesting Lok Sabha elections
Why is Nirmala Sitharaman not contesting Lok Sabha electionsSakal
Updated on

Loksabha Election 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 27 मार्च रोजी सांगितले की, मी लोकसभा निवडणूक लढवत नाही कारण त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी निधी नाही. सीतारामन म्हणाल्या की, भाजपने त्यांना तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता, परंतु त्यांनी 7 ते 10 दिवस विचार करून नकार दिला.

जेव्हा सीतारामन यांना विचारण्यात आले की देशाच्या अर्थमंत्र्यांकडे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे का नाहीत, तेव्हा त्या म्हणाल्या की, भारताचा निधी हा त्यांचा वैयक्तिक निधी नाही.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, "मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची आभारी आहे की त्यांनी माझे ऐकले आणि आता मी निवडणूक लढवत नाही.'' (Nirmala Sitharaman says she doesn’t have money to contest Lok Sabha election, declines BJP ticket)

सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या अनेक विद्यमान राज्यसभा सदस्यांना उमेदवारी दिली आहे. (Nirmala Sitharaman decides against contesting Lok Sabha polls)

Why is Nirmala Sitharaman not contesting Lok Sabha elections
Policy Bazaar : ‘पॉलिसीबझार’च्या सल्लागार मंडळात तीन तज्ज्ञांची नियुक्ती

भाजप उमेदवारांचा प्रचार करणार

19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने अनेक विद्यमान राज्यसभा सदस्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, यावेळी कर्नाटकचे राज्यसभा सदस्य असलेल्या अर्थमंत्र्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला.

मात्र, निवडणूक लढवण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी त्या इतर उमेदवारांसाठी प्रचार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

निर्मला सीतारामन यांची संपत्ती किती आहे?

तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदार झालेल्या निर्मला सीतारामन या केंद्रीय मंत्री आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर त्या आंध्र प्रदेशमधून राज्यसभा सदस्य झाल्या.

त्यानंतर त्या कर्नाटकातून दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता.

Why is Nirmala Sitharaman not contesting Lok Sabha elections
Unemployment : बेरोजगारी वीस वर्षांमध्ये दुप्पट झाली

त्या प्रतिज्ञापत्रानुसार, निर्मला सीतारामन यांची संपत्ती 2.63 कोटी रुपये होती आणि त्यांच्यावर एकूण 73 लाख रुपयांचे देणी होती. निर्मला सीतारामन यांच्याकडे दोन कार, एक स्कूटर आणि 315 ग्रॅम सोने होते. याशिवाय त्यांच्याकडे 2 किलो चांदी, पतीकडे 30 ग्रॅम सोने आणि मुलांकडे 124 ग्रॅम सोने होते. त्यांच्याकडे 1.15 कोटी रुपयांची रहिवासी इमारत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.